महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आत्मनिर्भरता अन् स्वदेशीकरणावर जोर : वायुदलप्रमुख

06:15 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Emphasis on self-reliance and indigenization: Air Force Chief
Advertisement

वायुदलाची 60 हजारांहून अधिक उपकरणे भारतनिर्मित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय वायुदल स्वदेशी तंत्रज्ञानावर जोर देत आहे. आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम देखील समोर येत आहे. मागील दोन-तीन वर्षांमध्ये अनेक सैन्य उपकरणे भारतातच विकसित करण्यात आली आहेत. भारतात निर्माण करण्यात आलेली उपकरणे सर्व निकषांची पूर्तता करणारी ठरल्यावरच वायुदलाच्या ताफ्यात त्यांना सामील करण्यात आले आहे. मागील दोन-तीन वर्षांमध्ये विकसित करण्यात आलेल्या अशा स्वदेशी उपकरणांची संख्या सुमारे 6 हजार असल्याचे वक्तव्य वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी केले आहे.

वायुदल दुरुस्ती आणि सर्वंकष देखभालीसाठी नेहमी विदेशी कंपन्यांवर निर्भर राहू शकत नाही. विदेशी ओईएम म्हणजेच उपकरणांच्या मूळ उत्पादक कंपन्यांवर भारत कायमस्वरुपी विश्वास ठेवू शकत नाही. बदलत्या स्थितींमध्ये दुरुस्ती आणि ओव्हरहॉल मेंटेनेंस यासारख्या अनेक गोष्टींप्रकरणी आत्मनिर्भर व्हावे लागेल असे वायुदलाचे मानणे असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.

आता सर्व बेस रिपेयर डेपोमध्ये उद्योगजगताच्या बहुतांश कंपन्या काम करू शकतील. वायुदलासाठी औद्योगिक जगत कोणते योगदान देऊ शकते हे पाहण्याची संधी त्यांना मिळणार आहे. बेस रिपेयर डेपोसोबत वायुदलाच्या सर्व शाखांमध्ये योगदान देण्यासाठी पात्र कंपन्यांसाठी दरवाजे खुले आहेत. मागील 2-3 वर्षांमध्ये 60 हजारांहून अधिक घटकांचे स्वदेशीकरण करण्यास यश मिळाले असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.

चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यानजीक बंगालच्या उपसागरात भारतीय वायुदलाच्या मालवाहू विमानाचे अवशेष मिळाले आहेत. दुर्दैवाने याकरता मोठा कालावधी लागला आहे, परंतु समुद्रतळाशी अशा गोष्टींचा शोध लावणे उल्लेखनीय यश असते. आता वायुदल कमीत कमी खोल समुद्रात संशोधन करण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त आहे. अवशेष मिळाल्मुळे आता दीर्घकाळापासून निर्माण झालेले गूढ संपुष्टात आले आहे. शोधमोहीम सुविधाजनक करण्यासाठी आणि अवशेष शोधण्यास सक्षम करण्यासाठी महासागर आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे आम्ही आभारी आहोत असे उद्गार वायुदलप्रमुख चौधरी यांनी काढले आहेत.

Advertisement
Next Article