कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एमिली इन पॅरिस 5’ लवकरच

06:33 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रेक्षकांना पहायला मिळणार नवी प्रेमकथा

Advertisement

पॅरिसच्या पार्श्वभूमीवर निर्मित एक रोमँटिक सीरिज ’एमिली इन पॅरिस’मध्ये लिली कॉलिन्स ही एमिलीच्या भूमिकेत आहे. लवकरच ती याच्या पाचव्या सीझनमध्ये देखील दिसून येणार आहे. लिली कॉलिन्स लवकरच या सीझनचे चित्रिकरण सुरू करणार आहे. यावेळी प्रेक्षकांना एमिलीच्या कहाणीत एक नवी प्रेमकथा पहायला मिळणार आहे, यात ड्रामा अन् रोमान्स देखील असेल.

Advertisement

या सीझनचे चित्रिकरण मे महिन्यात सुरू होणार असून ते प्रारंभी रोम आणि नंतर पॅरिसमध्ये पार पडणार आहे. यावेळी एमिली इटलीत स्वत:च्या नव्या प्रियकरासोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. एमिलीच्या नव्या प्रियकराची भूमिका यूजेनियो फ्रांसेचिनी साकारणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, यावेळी एमिलीसाठी सीरिजमध्ये गोंधळाची स्थिती असणर आहे. यावेळी ती ज्यांच्यावर प्रेम करते असे तीन पुरुष समोर असणार आहेत. एमिली आता कुणाला निवडणार असा प्रश्न उभा ठाकणार आहे. एमिलीच्या आयुष्यात लुकास ब्रावो (गॅब्रिएल), लुसिएन लॅविस्काउंट (अल्फी) आणि यूजेनियो फ्रांसेचिनी असतील.

एमिली इन पॅरिस 5 मध्ये यावेळी काही प्रसिद्ध फ्रेंच कलाकारही दिसून येतील. यात फिलिपीन लेरॉय, सॅम्युअल अर्नोल्ड, ब्रूनो, विलियम अबैडी, एशले पार्क सामील आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article