For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पीलबर्ग यांच्या चित्रपटात दिसणार एमिली ब्लंट

06:41 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पीलबर्ग यांच्या चित्रपटात दिसणार एमिली ब्लंट
Advertisement

अभिनेत्री एमिली ब्लंट आता स्टीवन स्पीलबर्ग यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. स्टीवन यांच्या अन्य चित्रपटांप्रमाणेहा हा चित्रपट देखील रहस्यमय असणार आहे. या चित्रपटात डेव्हिड कोएप यांची कहाणी दिसून येणार आहे. त्यांनी यापूर्वी ज्युरासिक पार्क, वॉर ऑफ द वर्ल्ड्स, इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल या चित्रपटांची कहाणी लिहिली होती.

Advertisement

स्टीवन स्पीलबर्ग यांचा हा चित्रपट पुढील वर्षी 15 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. एमिली ब्लंट यापूर्वी क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ या चित्रपटात दिसून आली होती. याचबरोबर तिने ‘एज ऑफ टुमारो’, ‘इनटू द वुड्स’, ‘ए क्वाइट प्लेस’ यासारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

स्टीवन स्पीलबर्ग यांनी तीनवेळा ऑस्कर पटकविला आहे. सेविंग प्रायव्हेट रयान आणि शिंडलर्स लिस्ट या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळविला होता. तसेच शिंडलर्स लिस्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. स्पीलबर्ग यांनी अलिकडेच ‘द फॅबेलमॅन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला ऑस्करची 7 नामांकने मिळाली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.