'या' तारखेला ओटीटीवर येणार ‘इमर्जन्सी’
मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. १७ जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. या चित्रपटात राजकीय ड्रामा असल्याने सिने वर्तुळात भरपूर चर्चा रंगली, मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमा फ्लॉप ठरला. आता हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध होणार आहे. स्वतः कंगनाने याबाबत माहिती दिली आहे.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणीच्या घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या सिनेमात कंगनाने इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शन देखील कंगनानेच केले आहे. आता अभिनेत्रीने चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट १७ मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
दरम्यान, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे कलेक्शन केवळ २१ कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर, आता प्रेक्षकांची ओटीटी प्लॅटफॉर्मवर पसंती मिळती का हे पाहावे लागेल. या चित्रपटात कंगनासोबतच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाख नायर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहे.