महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

06:55 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठा अपघात टळला, हवेत असतानाच रोटरमध्ये बिघाड

Advertisement

वृत्तसंस्था/ केदारनाथ

Advertisement

उत्तराखंडमधील केदारनाथ धामला जाणाऱ्या क्रिस्टल कंपनीच्या हेलिकॉप्टरचे रोटरमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या बिघाडामुळे हेलिकॉप्टर  हेलिपॅडपासून दूरवर उतरवण्यात आले. पायलटने प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असून पायलटसह सहा जणांचे प्राण थोडक्मयात वाचल्याचे सांगण्यात आले. गढवाल विभागाचे आयुक्त व्ही. एस. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगपूर्वी हेलिकॉप्टरने दोन फेऱ्या मारल्या. तिसऱ्या फेरीत त्याचे ब्लेड अचानक खराब झाले, मात्र पायलटच्या शहाणपणामुळे मोठी दुर्घटना टळली.

चारधाम यात्रेदरम्यान आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी धामांवर पोहोचत आहेत. याचददरम्यान, शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. केदारनाथ धामसाठी हेली सेवेत लोकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. काही तांत्रिक समस्येमुळे सिरसी हेलिपॅडवरून श्री केदारनाथ धामकडे प्रवाशांसह येणाऱ्या केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरला श्री केदारनाथ धामच्या हेलिपॅडच्या 100 मीटर आधी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळ गाठत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article