महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवसभरात 20 विमानांचे इमर्जन्सी लँडिंग

06:22 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेल्या 7 दिवसात 90 विमानांना बॉम्बची धमकी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्मया मिळण्याचा टेंड सुरूच आहे. शनिवारी भारतीय विमान कंपन्यांच्या 30 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या होत्या. त्यानंतर रविवारीही दिवसभरात 20 विमानांचे धमक्यांमुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सततच्या या धमक्मयांमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवलेली असतानाही गेल्या सात दिवसांत 70 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या आहेत.  एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, विस्तारा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या विमानांना धमक्मया आल्या आहेत. यातील काही विमानांना इमर्जन्सी लँडिंगही करावे लागले. इंडिगोच्या दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल, जोधपूर ते दिल्ली आणि विस्ताराच्या उदयपूर ते मुंबई या विमानांचा प्रामुख्याने बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळालेल्यांमध्ये समावेश आहे.

लंडन, दुबईला जाणाऱ्या विमानांनाही धोका

शुक्रवारी रात्री उशिरा एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्ताराच्या प्रत्येकी एका फ्लाईटला बॉम्बची धमकी मिळाली. विस्ताराचे दिल्लीहून लंडनला जाणारे विमान

प्रॅंकफर्टला वळवावे लागले, तर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दुबईहून जयपूरला जाणाऱ्या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तपासादरम्यान दोन्ही विमानांमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही.

खोटी धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई पोलिसांनी खोट्या धमक्मया दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे, तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सततच्या धमक्मयांदरम्यान 6 एफआयआर नोंदवले असून 10 सोशल मीडिया खाती ब्लॉक केली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट बॉम्बच्या धमक्मया पसरवल्या जात होत्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article