For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरुंगात डायटिंग होत नसल्याने मुक्तता

06:22 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
तुरुंगात डायटिंग होत नसल्याने मुक्तता
Advertisement

घरी जाऊन वजन कमी कर

Advertisement

जगात तुम्ही अनेक विचित्र घटनांबद्दल ऐकले असेल. अशाचप्रकारची एक घटना इटलीत घडली आहे. येथील एका कैद्याला तुरुंगातून केवळ यासाठी मुक्त करण्यात आले कारण तुरुंगात त्याचे डायटिंग होऊ शकत नव्हते. ज्या मारेकऱ्याला 30 वर्षांसाठी तुरुंगवास भोगायचा होता, त्याला डायटिंगकरता शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच मुक्त करण्यात आले आहे.

हे प्रकरण 2017 मधील आहे. दिमित्री फ्रिकानो नावाच्या एका इसमाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. दिमित्रीने स्वत:च्या प्रेयसीचीच हत्या केली होती. त्याच्या प्रेयसीचे नाव एरिक होते आणि तिच्याशी भांडण झाल्यावर दिमित्रीने चाकूने वार करत तिची हत्या केली होती. त्याने स्वत:चा गुन्हा कबूल केला होता. या गुन्ह्यासाठी त्याला 30 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Advertisement

वजन कमी करण्यासाठी सुटी

2022 मध्ये त्याला शिक्षा झाली आणि महामारीमुळे त्याचे वजन अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढले. अटकेवेळी तो 100 किलो वजनाचा होता तर पुढील काळात त्याचे वजन 200 किलो झाले होते. तुरुंगात तो चालू फिरूही शकत नव्हता. तसेच पूर्णवेळ व्हिलचेअरवर असायचा. त्याला हृदयविकाराचा धोका निर्माण झाल्याने डॉक्टरांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. तुरुंगात डायटिंग होत असल्याने न्यायाधीशांच्या एका समितीने त्याला वजन कमी करण्यासाठी स्थानबद्धतेत ठेवण्याचा आदेश दिला. या चकित करणाऱ्या निर्णयामुळे त्याच्या प्रेयसीचे कुटुंबीय नाराज झाले आहेत. दिमित्री तुरुंगातून केवळ स्वत:च्या वजनामुळे मुक्त झाला आहे.

Advertisement
Tags :

.