For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी टर्मिनससाठी पंतप्रधान मोदींना ई- मेल

03:09 PM Sep 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी टर्मिनससाठी पंतप्रधान मोदींना  ई  मेल
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा गेले कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्येंकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई मेल द्वारे तक्रार नोंदविण्याच्या मोहिमेतून लक्ष वेधून घेण्याची मोहिम सावंतवाडी टर्मिनस संघर्ष समितीने सुरु केली आहे.सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्याची गेले कित्येक दिवसांची मागणी प्रलंबित आहे.त्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने पाठपुरावा सुरु ठेवलेला आहे.मात्र या मागणीची अजूनही दखल घेतलेली नाही.सावंतवाडी रेल्वे टर्मिनसाठी तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे संघर्ष समिती प्रवास संघटना व नागरिकांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आली.आंदोलने व उपोषण करण्यात आले.त्याचीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नाही.सहाजिकच सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे याकडे थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस संघर्ष समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई मेल द्वारे तक्रार नोंदणी मोहिम सुरु करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार तक्रार नोंदविण्याची मोहिम सुरु झाली आहे.कोकण रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सव कालावधी २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुंबईकर चाकरमानी गणेश भक्तांसाठी जादा गाड्या सोडून उत्तम नियोजन केले होते.परंतु, मुंबईप्रमाणे पुण्यासारख्या मोठ्या शहराकडून कोकणासाठी एकही विशेष गाडी सोडण्यात आली नाही. कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्या सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला थांबत नाही.त्यामुळे येथील प्रवाशांना प्रवास करताना गैरसोय होते.तसेच दररोज सुटणाऱ्या काही ठराविक गाड्यांवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागते.जर सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनला टर्मिनल झाले तर सर्व गाड्या थांबून येथील प्रवाशांची गैरसोय दूर होईल.सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशनवर गर्दीच्या वेळी असलेल्या फलाटांवर प्रवाशासाठी निवारा शेडची आवश्यकता आहे.गणेशोत्सव कालावधीत पाऊस सुरु होता,अशावेळी फलटावर निवारा शेडची सोय नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोय सामोरे जावे लागले. पण बाबीकडे अद्यापर्यत प्रशासन लक्ष देत नाही.

मिळालेला कोड संघर्ष समितीच्या व्हॉटस्अप ग्रुपवर शेअर करा !
सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन टर्मिनससाठी संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संघर्ष समिती व नागरिकांच्या माध्यमातून ई मेलद्वारे तक्रार नोंदवल्यावर एक विशिष्ट क्रमांकाचा कोड मिळेल तो संघर्ष समितीच्या व्हॉटस्अप ग्रुपवर शेअर करुन कोकणवासीयांने सहभाग घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रश्न मार्गी लागण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.