महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रकृती अस्वास्थ्यामुळे एल्विश रुग्णालयात

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डेंग्यू, मलेरियाची चाचणी होणार : बेड रेस्टचा सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था /गुरुग्राम

Advertisement

बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवची तब्येत गुरुवारी अचानक बिघडली. त्याला गुऊग्राममधील खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी एल्विशला डेंग्यू, मलेरिया आणि सीबीसी तपासण्या करण्याची सूचना केली आहे. तसेच वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार डॉक्टरांनी एल्विशला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. एल्विश यादववर सापांची तस्करी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला गुऊवारी पुन्हा चौकशीसाठी नोटीस पाठवली होती, मात्र त्याची प्रकृती खालावल्याने तो चौकशीसाठी हजर होऊ शकला नाही. त्याने पोलिसांना आपल्या प्रकृती अस्वास्थ्याविषयीची कल्पना दिली असून आता पोलीस त्याला रिमाइंडर नोटीस बजावू शकतात. नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप असलेल्या एल्विश यादवची तब्येत अचानक बिघडली आहे. तरीही या प्रकरणाची चौकशी लवकर सुरू करता यावी यासाठी पोलीस एल्विश यादवच्या संपर्कात आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article