ब्राझीलच्या प्रथम महिलेकडून एलॉन मस्क लक्ष्य
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांच्या पत्नी जान्जा लूला डी सिल्वा यांनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांना उद्देशून वादग्रस्त टिप्पणी केली आहे. जी20च्या एका कार्यक्रमात ब्राझीलच्या प्रथम महिलेने मस्क विरोधात अपशब्द उच्चारले आहेत.
सोशल मीडियाला नियंत्रित करण्याची गरज आहे. सोशल मीडियाद्वारे बनावट बातम्या फैलावल्या जात असल्याचे म्हणत जान्जा यांनी एलॉन मस्क यांना मी घाबरत नसल्याची टिप्पणी केली आहे. ब्राझीलने एक्स प्लॅटफॉर्मवर एक महिन्यासाठी बंदी घातली आहे. एक्स प्लॅटफॉर्मद्वारे बनावट बातम्या फैलावल्या जात असून हा प्रकार देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे ब्राझील सरकारने म्हटले होते.
ब्राझीलच्या प्रथम महिला जान्जा यांचे सोशल मीडिया अकौंट मागील वर्षी हॅक झाले होते, याकरता त्यांनी एक्स या कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. तेव्हापासून जान्जा आणि एलॉन मस्क यांच्याकडून परस्परांच्या विरोधात टिप्पणी केली जात आहे.