For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बॅडलँड्स’मध्ये एली फॅनिंग मुख्य भूमिकेत

06:03 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बॅडलँड्स’मध्ये एली फॅनिंग मुख्य भूमिकेत
Advertisement

लवकरच सुरू होणार चित्रपट

Advertisement

एली फॅनिंग ही हॉलिवूड अभिनेत्री आता ‘बॅडलँड्स’ या चित्रपटात दिसून येणार आहे. हा डॅन ट्रॅचेनबर्ग यांचा चित्रपट असून तो प्रिडेटर ब्रह्मांडाचा विस्तार करणारा आहे. 20थ सेंच्युरी स्टुडिओजकडून या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ट्रेचेनबर्ग यांची निवड करण्यात आली आहे. तर पटकथा पॅट्रिक ऐसनसोबन मिळून ट्रेचेनबर्ग यांनीच लिहिली आहे.

प्रिडेटर प्रीक्वेल अत्यंत यशस्वी ठरला होता आणि हुलुवर प्रदर्शित झाल्यावर त्याने सर्व विक्रम मोडीत काढले होते. 2022 च्या या चित्रपटाला पाच प्राइमटाइम एमीसाठी नामांकनं मिळाली होती. प्री2 या चित्रपटात एम्बर मिडथंडर देखील दिसून येण्याची शक्यता आहे.

Advertisement

बॅडलँड्स या चित्रपटाची घोषणा फेब्रुवारीत करण्यात आली होती. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत याचे चित्रिकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे. एली फॅनिंगने अलिकडेच द ग्रेटचा कलाकार म्हणून तीन सीझन पूर्ण केले आहेत. या सीरिजमध्ये तिने रशियन सम्राट कॅथरिन द ग्रेटची भूमिका साकारली आहे.

एलीने मेलफिसेंट चित्रपटांमध्ये डिस्ने राजकन्येची भूमिका साकारली आहे. द गर्ल फ्रॉम प्लेनविले आणि वी बॉट ए झू, द निऑन डेमन, ट्वेटिएथ सेंचुरी वुमेन आणि समव्हेयर अँड द बेगल्ड या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Advertisement
Tags :

.