कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामतगा येथे हत्तींकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान

10:39 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी हवालदिल : भात कापून मळणी करण्याकडे कल : वनखात्याने दखल घेण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/गुंजी

Advertisement

गेल्या पंधरा दिवसापासून गुंजीसह परिसरात ठाण मांडून बसलेल्या हत्तींकडून दररोज कापणीस आलेल्या भात पिकाचे सतत नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला असून हवालदिल झाला आहे. सध्या या हत्तींनी कामतगा नजीकच्या तलावाच्या परिसरात ठाण मांडले असून येथील शेतकरी नागो नाईक, नामदेव नाईक, नेमाणी नाईकसह अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे खाऊन तुडवून प्रचंड नुकसान केले आहे.

वास्तविक गेल्या दोन दिवसांपूर्वीच सदर हत्ती जोमतळा-वाटरे भागात फिरल्याने येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र पुन्हा या भागात हत्तांrनी उच्छाद मांडला असून शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. सध्या या भागात सुगी हंगामास जोर आला असला तरी प्रत्येक भागातील शेतकरी आपापली भात कापणी करून मळणी करण्याकडे कल सुरू असल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्याचबरोबर हत्तींच्या दहशतीने केवळ दिवसा मळणीकाम सुरू असल्याने सुगी कामासही विलंब होत असल्याचे येथील शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

हत्ती हटाव मोहीम हाती घेणे गरजेचे

या परिसरातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे दररोजचे नुकसान पाहता अरण्य खात्याने हत्ती हटाव मोहीम घेऊन या भागातून हत्तींना पिटाळून लावणे आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीपासून जर या भागातून हत्तींना पिटाळले असते तर  शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान टळले असते. अद्यापही या भागात निम्म्याहून अधिक भात कापणी आणि मळणी शिल्लक असल्याने वनखात्याने त्वरित या भागातून हत्ती हटाव मोहीम हाती घ्यावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तरी संबंधितांनी याची दखल घेऊन या हत्तींना पिटाळून लावावे, तसेच शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article