कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीमाहद्दीत ‘चाळोबा गणेश’ हत्ती आक्रमक

06:56 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फ्रिज, पाण्याच्या टाकीचे नुकसान : वनखात्याचे दुर्लक्ष, मोर्चा मानवी वस्तीकडे, नागरिक संतप्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेकिनकेरे परिसरात स्थिरावलेला चाळोबा गणेश हत्ती आक्रमक झाला असून सीमाहद्दीवर असलेल्या हॉटेलमधील साहित्याचे रविवारी रात्री मोठे नुकसान केले आहे. या घटनेने हॉटेल मालकाला फटका बसला आहे. हत्तीने आता परिसरात दहशत निर्माण केली असून वनखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून हा हत्ती कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील डोंगर परिसरात ठाण मांडून आहे. दरम्यान शेती पिकाबरोबर आता मानवी वस्तीतही धुमाकूळ घालू लागला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. सीमाहद्दीवर असलेल्या संजय गावडे यांच्या हॉटेलमधील डीप फ्रीज आणि पाण्याच्या टाकीचे नुकसान केले आहे. त्यामुळे हॉटेल मालक हतबल झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय वनखात्याचा बेजबाबदारपणाही समोर आला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून दररोज नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान हत्ती आता अधिक आक्रमक झाला असून त्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हत्तीने परिसरातील रताळी, मका, ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शिवाय शिवारातील विद्युतपंप, पाईप आणि इतर यंत्रोपकरणांचेही नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. याबाबत वनखात्याला घेराव घालून जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.

आजरा येथील असलेला हा हत्ती सध्या सीमाहद्दीतील छोट्याशा डोंगरात स्थिरावला आहे. दरम्यान डोंगरपायथ्याशी असलेल्या हॉटेल आणि मानवी वस्तीत धुमाकूळ घालू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी बाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. याबाबत वनखाते सक्रिय होऊन हत्तीला कधी हुसकावून लावणार? असा प्रश्नही पडू लागला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article