महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इलेक्ट्रोलाईट इंधनघटाचे परीक्षण यशस्वी

06:26 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रोची आणखी एक भरीव कामगिरी, अग्निबाणाच्या प्रक्षेपणात होणार उपयोग

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी आणखी एक भरीव यश संपादन केले आहे. पॉलिमर इलेक्ट्रोलाईट मेंब्रेन फ्युएल सेलचे परीक्षण या संस्थेने यशस्वी केले आहे. हा सेल 100 वॅट श्रेणीतील आहे. गेल्या सोमवारी इस्रोने क्ष किरण पोलारीमीटर उपग्रहाचे आणि त्याच्यासह 10 छोट्या उपग्रहांचे अवकाशात एकाचवेळी प्रक्षेपण यशस्वी केले होते. त्यापाठोपाठ हे यश मिळाले आहे.

पॉलिमर इलेक्ट्रोलाईट मेंब्रेन फ्युएल सेलचा उपयोग अवकाशातील महत्त्वाची माहिती संकलित करण्यासाठी केला जातो. ही माहिती भारताच्या भविष्यकालीन अवकाश अभियानांच्या यशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तिचे संकलन आवश्यक आहे. हा  फ्युएल सेल आणि त्याच्या आधारावर चालणाऱ्या ऊर्जा यंत्रणेचे परीक्षण ऑर्बिटल प्लॅटफार्ममध्ये करण्यात आले. हा ऑर्बिटल प्लॅटफॉर्म 1 जानेवारीला प्रक्षेपित करण्यात आलेल्या पोलारीमीटर उपग्रहाचा एक भाग आहे.

180 वॅट ऊर्जेची निर्मिती

या फ्युएल सेलच्या परीक्षणातून 180 वॅट क्षमतेच्या ऊर्जेची यशस्वीरित्या निर्मिती करण्यात आली आहे. हे अल्पकालीन परीक्षण होते. या पोलारीमीटर उपग्रहात असलेल्या हैड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंचे मिश्रण करून या ऊर्जेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासमवेतच उपोत्पादनाच्या स्वरुपात शुद्ध पाणी आणि उष्णतेचीही निर्मिती झाली. हे ऊर्जानिर्मिती उपकरण इलेक्ट्रोकेमिकल तत्त्वावर काम करणारे आहे. ही प्रक्रिया सुटसुटीत असल्याने अंतराळात विद्युतनिर्मिती करणे आता शक्य होणार आहे. हे यश मिळविणारा भारत केवळ चौथा देश आहे.

सुरक्षित उपकरण

हा फ्युएल सेल हे एक सुरक्षित उपकरण असून यात दोन प्रकारच्या इंधनांना एकमेकांच्या संपर्कात थेटपणे आणले जाते. तसेच उपोत्पादन म्हणून केवळ पाण्याची निर्मिती होते. यातून कोणताही घातक किरणोत्सार होत नाही. परिणामी, उपग्रहातील इतर साधने सुरक्षित राहतात, अशी माहिती देण्यात आली आहे.

चांद्रयानाच्या यशस्वी प्रयोगानंतर...

चंद्रावर यशस्वीरित्या चांद्रवाहनाचे अवतरण केल्यापासून इस्रोने विविध अभियानांचा धडाका लावला आहे. आता या संस्थेचे ध्येय प्रथम अंतराळात आणि नंतर चंद्रावर मानव उतरविण्याचे आहे. त्याचप्रमाणे अवकाशात प्रयोगशाळा संस्थापित करण्याचीही इस्रोची महत्त्वाकांक्षा आहे. या सर्व कार्यक्रमांना येत्या सहा ते दहा वर्षांमध्ये साकारले जाणार आहे, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article