महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हेस्कॉमकडून ग्राहकाला वीजबिलाचा शॉक

10:19 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल 5229 रुपयांचे बिल दिले पाठवून

Advertisement

बेळगाव : घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गृहज्योती योजना लागू केली. गृहज्योती योजनेसाठी अर्ज करूनही अवघ्या चारच महिन्यात घरगुती ग्राहकाचे 5,229 रुपये विद्युतबिल आल्याचा प्रकार कोतवाल गल्ली येथे घडला आहे. पहिल्या महिन्यात 13 रुपये आलेले विद्युतबिल चौथ्या महिन्यात तब्बल 5 हजार कसे आले? या चिंतेने सदर वीजग्राहक ग्रासला आहे. कोतवाल गल्ली येथील रहिवासी फिरोज मुल्ला यांचे मागील वर्षभरापासून 300 ते 400 रुपये विद्युतबिल येत होते. गृहज्योती योजनेला अर्ज केल्यानंतर पहिल्या महिन्यात 13 रुपये बिल आले. परंतु, नवे मिटर बसविल्यापासून 300 युनिट वापर झाल्याचे दाखवून 1500 रुपये बिल टाकण्यात आले. आपल्याला विनाकारण बिल देण्यात आले असल्याचे हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद देण्यात आला नसल्याने त्यांनी एका महिन्याचे बिल भरले नाही. पुढील महिन्यात तब्बल 5229 रुपये बिल देण्यात आल्याने संतप्त झालेल्या फिरोज यांनी हेस्कॉममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Advertisement

हेस्कॉम कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे

फिरोज मुल्ला यांनी रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात जाऊन वीज बिलाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी एका महिला अधिकाऱ्याने फिरोज यांना उद्धट उत्तरे दिली. यावेळी फिरोज यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडिओ चित्रीकरण केला असून याची माहिती आपण वरिष्ठांना देऊ, असे सांगितले. परंतु, त्या महिला कर्मचाऱ्याने तुम्हाला कोणाला तक्रार करायची ती करा, मला काही फरक पडत नाही, आपण येथून निघून जा, असे उद्धट उत्तर दिले.

तक्रार कोणाकडे करायची?

गृहज्योती योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पहिल्या महिन्यात 13 रुपये घरचे विद्युत बिल आले. दोन महिन्यांपूर्वी हेस्कॉमकडून नवे मीटर बसविण्यात आले. तेव्हापासून बिलामध्ये मोठी वाढ झाली. नवा मीटर बसविलेल्या महिन्यात 1568 तर या महिन्यात तब्बल 5229 रुपये बिल देण्यात आले आहे. हेस्कॉम कर्मचाऱ्यांकडूनही उद्धट उत्तरे दिली जात असल्याने याबाबत तक्रार कोणाकडे करायची? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- फिरोज मुल्ला (वीजग्राहक)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article