महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चरणाऱ्या म्हैशीला विजेचा शॉक! जाग्यावरच दुर्दैवी मृत्युमुखी; वावदरे येथील घटना

04:25 PM Sep 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
Electric shock to the grazing buffalo Vavadare
Advertisement

कास वार्ताहर

शेतात गवत चरत असलेल्या म्हशीला विजेच्या खांबाचा अचानकच शॉक बसल्याने म्हैस जाग्यावरच तडफडत मृत्युमुखी पडली. ही घटना वावदरे येथे दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली. डोळ्यादेखत विजेचा शॉक बसून म्हैस मृत्युमुखी पडत असताना म्हैशीच्या मालकांनी अक्षरशा हंबरडा फोडला .

Advertisement

परळी खोऱ्यातील वावदरे येथील शेतकरी रवींद्र संभाजी चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे चरावयास घेऊन शेतात गेले . तिथे असलेल्या विजेच्या खांबा जवळ म्हशी गवत चरत होत्या. अचानकच विजेच्या प्रवाहाने त्यांच्या म्हैशीस ओढले गेले आणि काही समजण्याच्या आत म्हैस तडफडू लागली. ही घटना रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी इतर जनावरे लांब हाकली मात्र डोळ्यात विकत आपली म्हैस ते विजेच्या प्रवाहाच्या शॉक मधून वाचवू शकले नाहीत. ही घटना ग्रामस्थांना कळवली ग्रामस्थांनी तात्काळ वीज वितरण विभागाला या घटनेची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी तलाठी यांनी पंचनामा पूर्ण केला सुमारे सत्तर हजार रुपयांची किंमत असलेली म्हैस दगावल्याने ग्रामस्थांच्यात हळूहळू व्यक्त होत होती.

Advertisement

Advertisement
Tags :
electric shockthe grazing buffaloVavadare
Next Article