For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या जागेतले विजेचे खांब काढावेत

03:33 PM Dec 27, 2023 IST | अनुजा कुडतरकर
पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या जागेतले विजेचे खांब काढावेत
Advertisement

इन्सुली ग्रामस्थांची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या जागेतून इन्सुली माडभाकर येथे उभे करण्यात आलेले विजेचे खांब व लाईन काढण्यासाठी आपल्या मार्फत तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आम्ही तुमच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असे लेखी निवेदन इन्सुली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग चराठा यांना दिले आहे.तसेच याबाबतची प्रत सावंतवाडी तहसीलदार यांना दिली आहे. यावेळी आपण तात्काळ विजवितरणला लेखी पत्र देतो असे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले.

Advertisement

या निवेदनात त्यांनी म्हटले की, तिलारी कालवा इन्सुली माडभाकरवाडी येथे मुख्य कालव्यावरून विद्युत लाईन टाकण्याचे काम महावितरण करून चालू आहे. सदरचे काम आपल्या जागेतून सुरू असल्याचे निदर्शनास येते व ते खरे सुरू आहे. आम्ही इन्सुली ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला आमच्या जमिनी पाणी मिळेल या आशेने दिल्या होत्या. जमिनी खरेदीचा दर ही कवडीमोल होता. मात्र केवळ पाण्यासाठी आमच्या वडीलधारी माणसांनी तुम्हांला जमीनी दिल्या. सदर जागेत ज्या उच्च दाबाच्या लाइनचे काम सुरू आहे त्यास आपण परवानगी दिली का? जर दिली असेल तर आपला विभाग त्या लाईनमुळे कोणती मनुष्यहानी, शेतीचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्यास जबाबदारी घेते का हे आपल्याकडुन लेखी स्पष्ट करा अशी आमची मागणी आहे. ही लाईन टाकण्यासाठी आमचा विरोध असून तुम्ही महावितरणला परवानगी दिल्यास ती तात्काळ रद्द करावी किंवा यापुढे कोणतीही परवानगी देऊ नये. तसेच इन्सुली गावात तुमच्या जागेत टाकलेले खांब तुम्ही तात्काळ काढण्यासंबंधी त्या विभागाशी पत्रव्यवहार करावा तोपर्यंत ते काम बंद ठेवावे ही आपली जबाबदारी राहील.

याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास आम्ही आपल्या चराठा सावंतवाडी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.तुमच्या कडून न्याय न मिळाल्यास आम्ही याबाबत तुमच्या वरिष्ठांकडे दाद मागू त्यासाठी झाल्यास लोकशाही मार्गाने दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आम्ही तमाम इन्सुली ग्रामस्थ मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार आहोत. व त्या ठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास त्यास आपला जलसंपदा विभाग राहील याची नोंद घ्यावी याबाबतची एक प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, तहसीलदार सावंतवाडी यांना दिली आहे. यावेळी ग्रामस्थ संतोष मोरजकर, साईप्रसाद राणे, हेमंत नाईक,संदीप कोठावळे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.