‘मिठा’द्वारे धावणार इलेक्ट्रिक बाइक
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे लोक हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. कारपासून बाइक आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी समस्या चार्जिंगवरून आहे. जग एकीकडे लिथियम ऑयन बॅटरीयुक्त इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करू पाहत आहे. तर एक देश मात्र याच्यापुढे 4 पावले निघून गेला आहे. या देशाने सागरी मिठाद्वारे बॅटरी तयार केली आहे. याचा वापर आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केला जाऊ शकतो. ही एक प्रकारची सॉल्ट आयन बॅटरी असून ती सोडियमने तयार करण्यात आली आडहे. तर सोडियम हे सागरी मिठातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. आतापर्यंत इलेक्ट्रिक बाइक या लिथियम ऑयन बॅटरीद्वारे धावत होत्या. परंतु चीनच्या एका कंपनीने सॉल्ट आयन बॅटरी तयार केली असून याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केला जातोय. चीनच्या कंपनीने या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक बाइक्सची तीन वेगवेगळी मॉडल्स सादर केली आहेत. त्यांची किंमत 400 ते 600 डॉलर्सदरम्यान आहे.
15 मिनिटात होते चार्ज
एकीकडे लिथियम ऑयन बॅटरी असलेली इलेक्ट्रिक वाहने चार्ज होण्यासाठी मोठा वेळ घेतात. तर सॉल्ट आयन बॅटरी आधारित इलेक्ट्रिक वाहन 15 मिनिटात फुल चार्ज होते. चीनच्या हांग्जो शहरात या इलेक्ट्रिक स्कुटर्सची लाइव्ह टेस्ट ड्राइव्ह देखील आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान बॅटरी 15 मिनिटात 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज झाल्याचे दिसून आले.