महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विरोधकांच्या बहिष्कारातच बांगलादेशात मतदान

06:34 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

तुरळक हिंसाचार आणि मुख्य विरोधी पक्ष ‘बीएनपी’ने बहिष्कार टाकला असताना पंतप्रधान शेख हसीना सलग चौथ्यांदा विजयी होण्याची शक्मयता असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेशींनी रविवारी अल्प संख्येने मतदान केले.  प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 40 टक्के मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी सांगितले.

Advertisement

मतदान संपण्याच्या एक तास अगोदर दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाने 27.15 टक्के मतदान झाल्याचे सांगितले होते. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 80 टक्क्मयांहून अधिक मतदान झाले होते. मतदान दुपारी 4 वाजता संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाल्याचे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले. सोमवारी पहाटेपर्यंत निकाल अपेक्षित होते. संपूर्ण बांगलादेशात सकाळी 8 वाजता (स्थानिक वेळेनुसार) मतदान सुरू झाले. 27 राजकीय पक्षांच्या 1,500 हून अधिक उमेदवारांशिवाय 436 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवणाऱ्या 27 राजकीय पक्षांमध्ये विरोधी राष्ट्रीय पक्षाचाही समावेश आहे.

बहिष्काराच्या आवाहनानंतरही मतदान

देशातील प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इतर समविचारी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. बीएनपीने शनिवारपासून दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. विरोधक निवडणुकीवर बहिष्कार टाकत आणि विश्वासार्हतेबाबत आरोप करत जनतेला मतदान न करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. हिंसाचाराच्या काही तुरळक घटनांव्यतिरिक्त 300 पैकी 299 मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आयोगाने एका जागेवरील मतदान स्थगित केले आहे.

भितीच्या छायेखाली मतदान

बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानाअंती देशाच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसिना अवामी लीगच्या नेतृत्वाखालील युतीची चौथी टर्म पूर्ण करून पाचव्या टर्मसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहेत. ही निवडणूक निवडणूकपूर्व हिंसाचार आणि मोठ्या भितीच्या छायेत पार पडली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी एका पॅसेंजर टेनला आग लागल्याने हिंसाचार उसळला होता, त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. देशभरात जाळपोळ करण्याच्या अनेक घटनाही नोंदवण्यात आल्या आहेत. बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी मतदान प्रक्रियेत काही अनियमितता आढळल्यास निवडणूक रद्द केली जाईल, असा इशारा दिला होता.

Advertisement
Next Article