For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जि.प. 68, पंचायत समितीसाठी 136 जागांवर निवडणूक

04:21 PM Jun 14, 2025 IST | Radhika Patil
जि प  68  पंचायत समितीसाठी 136 जागांवर निवडणूक
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समित्यांच्या 136 जागांसाठी निवडणुक होणार असून, आगामी काळात प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार 14 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील चार महिन्यांत ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेवर सध्या अडीच वर्षांहून अधिक काळ प्रशासक कार्यरत असून, राजकीय घडामोडींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Advertisement

पंचायत समित्यांच्या एकूण 136 जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठीही प्रभाग रचना आणि आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे. राजकीय हालचालींना वेग या निवडणुकांमुळे जिह्यातील राजकीय पक्षांची हालचाल वेग घेणार असून, इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामुळे जिह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

  • प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया याप्रमाणे

14 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.
21 जुलैपर्यंत हरकती व सूचना जिल्हाधिक्रायांकडे सादर करता येणार आहेत.
28 जुलैपर्यंत प्राप्त हरकतींसह प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल.

  • एक गट वाढणार

2017 च्या जिल्हापरिषद निवडणूकीमध्ये शित्तूर तर्फ वारुण, सरुड, पिशवी, करंजफेण, सातवे, कोडोली, पोर्ले तर्फ ठाणे, यवलूज, कोतोली, कळे, घुणकी, भादोले, पुंभोज, हातकलंगणे, शिरोली, रुकडी, कोरोची, कबनूर, पट्टणकडोली, हुपरी, रेंदाळ, दानोळी, उदगाव, आलास, शिरोळ, नोदणी, अब्लुललाट, दत्तवाड, कसबा सांगाव, सिध्दनेर्ली, बोरवडे, नानीबाई चिखली, कापशी सेनापती, शिये, वडणगे, उचगाव, मुडशिंगी, उजळायवाडी, पाचगाव, शिंगणापूर, सांगरुळ, सडोली खालसा, परिते, निगवे खालसा, तिसंगी, आसळज, राशिवडे, बुद्रक, कौलव, कसबा वाळवे, सरवडे, राधानगरी, गारगोटी, पिंपळगाव, आकुर्डे, कडगाव, उत्तूर, कोळींद्रे, आजरा, बड्याचीवाडी, हलकर्णी, भडगाव, गिजवण, नेसरी, चंडगड, माणगांव, तुर्केवाडी, तुडेये असे 67 गट होते

  • निवडणुकीचा औपचारिक कार्यक्रम लवकरच

प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकांचे औपचारिक कार्यक्रम जाहीर केले जातील. त्यामुळे जिह्यातील नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.

Advertisement
Tags :

.