महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल विचित्र अन् रहस्यमय : मायावती

06:47 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 डिसेंबरला पक्ष करणार मंथन

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

बसप अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी 4 राज्यांच्या निवडणूक निकालांना विचित्र आणि रहस्यमय ठरविले आहे. 4 राज्यांचा निकाल एका पक्षाच्या बाजूने असल्याने सर्व लोकांना शंका आणि चिंता वाटणे स्वाभाविक आहे. निवडणुकीचे पूर्ण वातावरण पाहता असा विचित्र निकाल पचनी पडणे अत्यंत अवघड असल्याचे मायावती यांनी सोमवारी म्हटले आहे.

पूर्ण निवडणुकीदरम्यान अत्यंत चुरस दिसून आली. परंतु निकाल याच्या एकदम उलट पूर्णपणे एकतर्फी झाला. हे एक रहस्यमय प्रकरण असून यावर गंभीर चिंतन होणे आणि त्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे. लोकभावना ओळखण्यात भयंकर चूक निवडणुकीच्या चर्चेचा नवा विषय असल्याचे मायावती म्हणाल्या.

बसपच्या उमेदवारांनी पूर्ण शक्तिनिशी निवडणूक ढलविली होती, यामुळे वातावरण बसपच्या बाजूने निर्माण झाले होते. परंतु आम्ही या निकालामुळे निराश होणार नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा घेत वाटचाल करणार आहोत. या निकालाच्या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 10 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती मायावती यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article