महे ग्रामपंचायत सरपंचपदी सर्जेराव दिनकर जरग यांची निवड
कसबा बीड वार्ताहर
महे तालुका करवीरयेथील ग्रामपंचायत सरपंच पदी सर्जेराव दिनकर जरग यांची निवड करण्यात आली. सरपंच सज्जन तुकाराम पाटील याचा कार्यकाल झाल्याने त्यांनी आपला सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाचा कार्यकाल मुदत झाल्यानंतर आज बुधवार 24 जानेवारी रोजी सरपंच निवड करण्यात आली. यावेळी सर्जेराव दिनकर जरग यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मावळते सरपंच सज्जन पाटील यांनी 15 वित्त आयोगातून मंजूर झालेली पेजल योजना पूर्णत्वाकडे आली आहे. तसेच आमदार व खासदार फंडातून रस्ता डांबरीकरण ,काँक्रिटीकरण व नवीन गटर्स तयार करणे आदी कामे मंजूर करून घेतले असल्याचे सांगितले.त्यापैकी काही कामे पूर्णत्वाकडे आलेले आहेत असा आपल्या कार्यकाळातील केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा सांगितला.तर नूतन सरपंच सर्जेराव हुजरे यांनी धान्य दुकानदार पासून आपल्या समाजकार्याची सुरुवात केली आहे.गावात नवीन माध्यमिक शाळा काढणे ते को जी मा शी पतसंस्थेच्या चेअरमन पदापर्यंत आपण आज अखेर कार्य केले असल्याचे सांगितले.ज्या प्रभागातून मी सदस्य निवडून येऊन आज सरपंच झालो आहे.आपल्या पदाचा प्रामाणिकपणे व जबाबदारीने कामकाज करू असे सांगितले.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून कसबा बीडचे मंडलाधिकारी प्रवीण माने,ग्रामसेवक सौ. सुषमा कांबळे,तलाठी एस बी भुईगडे,तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव नवाळे, ग्रामपंचायतचे मावळते सरपंच सज्जन पाटील,उपसरपंच सविता कांबळे व सर्व सदस्य,महे गावचे बुद्धीराज पाटील ,बाजीराव जरग,सचिन पाटील, जगदीश पाटील, पांडुरंग केरबा पाटील , शहाजी पाटील , पांडुरंग शंकर पाटील , कृष्णात ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक सज्जन पाटील यांनी व आभार सुषमा कांबडे यांनी केले.