महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीस स्थगिती

10:11 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात मागितली होती दाद : हिरमोड

Advertisement

खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या नगरसेविकांना मोठी चपराक बसली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सहलीवर असलेल्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. नगराध्यक्षा पदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेविकांवर स्वप्नभंगाची वेळ आली आहे. उच्च न्यायालयात निवडणुकीसंदर्भात पुढील सुनावणी गुरुवार दि. 29 रोजी होणार आहे. त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक 26 ऑगष्ट रोजी होणार होती. दोन्ही पदांवर सर्वसामान्य महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या नगरसेविकांनी गेल्या आठ-दहा दिवसापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांनी आपली पत्नी नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर यांच्यासाठी काही नगरसेवकांना एकत्र करून घोडेबाजार करून नगरसेवकांना गोव्याला सहलीला नेऊन त्यांची एका मोठ्या हॉटेलात बडदास्त ठेवली होती. त्यामुळे मिनाक्षी बैलूरकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार हे निश्चित झाले होते. यातच नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात दाद मागत या निवडणुकीला स्थगिती मिळविली आहे. याबाबतची पुढील सुनावणी गुरुवार दि. 29 ऑगष्ट रोजी होणार आहे.

आठ वर्षात केवळ अडीच वर्षे नगरसेवकांना कारभाराची संधी मिळाली

खानापूर नगरपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच आठ वर्षात फक्त अडीच वर्षेच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊन नगरसेवकांना आपली सेवा बजावण्यात यश आले आहे. बाकीचा काळ हा प्रशासकानीच कारभार पाहिलेला आहे. त्यामुळे नगरसेवक असूनही त्यांना कोणतेही अधिकार वापरता आलेले नाहीत. शेवटच्या टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या. मात्र उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुन्हा या नगरसेवकांना आपल्या कार्यकाळापासून दूरच रहावे लागले. जर स्थगिती कायम राहिल्यास पुन्हा प्रशासकाच्या हातीच नगरपंचायतीचा कारभार राहणार आहे. जर अनुसूचित जातीसाठी राखीव जाहीर झाल्यास मोर्चेबांधणी करून घोडेबाजार केलेल्याना मोठा धक्का बसणार आहे.

मागासवर्गीय (अनुसूचित) जातीच्या आरक्षणावर अन्याय

लक्ष्मण मादार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, नगरपंचायतीच्या इतिहासात आतापर्यंत अध्यक्षपदासाठी मागासवर्गीय (अनुसूचित) जातीला आरक्षण मिळाले नाही. यामुळे या वर्गावर अन्याय झाला आहे. यावेळी अनुसूचित जातीच्या वर्गाला आरक्षण मिळेल, अशी आशा होती. मात्र निवडणूक आयोगाने दोन्ही पदे सामान्य महिलेसाठी जाहीर केल्याने यावेळीही अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे. यापूर्वी पाचवेळा सामान्य महिला वर्गाला अध्यक्षपदाचे आरक्षण मिळाले आहे. हाच मुद्दा घेऊन त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकूण खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर स्थगिती आदेश बजावला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणी करून नगरसेवकांची बडदास्त ठेवणाऱ्या प्रकाश बैलूरकर यांना मोठी चपराक बसली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article