For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेय भातकांडे यांची उपाध्यक्षपदी निवड

11:03 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेय भातकांडे यांची उपाध्यक्षपदी निवड
Advertisement

बेळगाव : विद्या प्रसारक शिक्षण मंडळ संचालित गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेच्या उपाध्यक्षपदी अमेय भातकांडे यांची निवड करण्यात आली आहे. उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात अमेय भातकांडे यांची शाळेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी केली. अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते अमेय यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या सचिव मधुरा भातकांडे उपस्थित होत्या. अमेय हे उत्कृष्ट क्रिकेटपटू असून अनेक स्पर्धांमधून त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेय यांनी येत्या काळात गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेसह पदवीपूर्व महाविद्यालय, तारा नर्सरी, केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, भातकांडे स्पोर्ट्स अकॅडमी, महात्मा ज्योतिबा फुले वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.