मराठा को-ऑप.बँक संचालकपदासाठी आज निवडणूक
प्रतिनिधी/ बेळगाव
चव्हाट गल्ली येथे मराठा को-ऑप. बँकेच्या संचालकांचा प्रचार धुमधडाक्यात झाला. प्रारंभी बजरंगबलीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चव्हाट गल्लीच्यावतीने बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे हित लक्षात घेऊन सुनील अष्टेकर, शरद पाटील यांनी प्रचारातून माघार घेऊन सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा दिला. मागास ब गटातील मोतेश बार्देशकर यांनी विश्वजित हसबे यांना पाठिंबा देत माघार घेतली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
मागास अ गट बिनविरोध करण्यासाठी गिरीश धामणेकर यांनी माघार घेतली. याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालक बाळासाहेब काकतकर, चेअरमन दिगंबर पवार यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सांगितला. महिला उमेदवार रेणू किल्लेकर यांनी मतप्रत्रिकेचे स्वरुप सांगितले.
मतदारांनी एकूण 14 शिक्के मारावयाचे असून पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवर 2, 3, 4, 5, 7, 9, 10, 11, 12 या क्रमांकावर 9 मते, गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर 1 व 2 मते, पिवळ्या मतपत्रिकेवर 3 क्रमांकावर, निळ्या मतपत्रिकेवर 1 क्रमांकावर व हिरव्या रंगाच्या मतपत्रिकेवर 1 क्रमांकावर 1 असे 14 शिक्के मारण्याचे सांगितले. गल्लीचे पंच प्रतापराव मोहिते यांनी सर्व उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रफुल्ल शिरवलकर यांनी केले. याप्रसंगी उदय किल्लेकर, किसन रेडेकर, चंद्रकांत कणबरकर, प्रवीण कुट्रे, रोहन जाधव, सत्यम नाईक, लता किल्लेकर, श्वेता पवार, श्रद्धा पवार उपस्थित होते.
मतदान रविवार दि. 22 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत होणार आहे. सामान्य गटासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असून त्यामध्ये सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार क्र. 2-टेबल, क्र.-3 सिलिंडर, क्र.-4 हेल्मेट, क्रमांक-5 कपाट, क्रमांक-7 बॅट, क्र.9-ग्लास, क्र.10-टोपी, क्र.11-नळ व क्र.12-आइस्क्रिम.
महिला गट गुलाबी रंगाची मतपत्रिका क्र.-1 बादली, क्रमांक-2 घागर. मागास ब गट पिवळ्या रंगाची मतपत्रिका क्र.-3 शिट्टी, एससी गटासाठी निळ्या रंगाची मतपत्रिका क्र.-1 टेलिफोन, एसटी गटासाठी हिरव्या रंगाची मतपत्रिका क्र.-1 कप व बशी आहे.