महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक

06:53 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

15 राज्यांचा समावेश : कर्नाटकातील 4 तर महाराष्ट्रातील 6 जागा : लोकसभेपूर्वी राज्यसभेसाठी ‘महाभारत’

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. 15 राज्यांतील 56 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली. राज्यसभेतील 50 सदस्य 2 एप्रिल रोजी तर सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. एकंदर देशात येत्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी राज्यसभेसाठी ‘महाभारत’ रंगणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, आंध्र प्रदेशात राज्यसभेच्या 3, बिहारमध्ये 6, छत्तीसगडमध्ये 1, गुजरातमध्ये 4, हरियाणामध्ये 1, हिमाचल प्रदेशमध्ये 1, कर्नाटकमध्ये 4, मध्य प्रदेशमध्ये 5, महाराष्ट्रातील 6, तेलंगणातील 3, उत्तर प्रदेशातील 10, उत्तराखंडमधील 1, पश्चिम बंगालमधील 5, ओडिशातील 3 आणि राजस्थानमधील 3 जागांवर निवडणूक होणार आहे.

यावषी राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असलेल्यांमध्ये अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदींची नावे आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांचा कार्यकाळही याच वषी संपत आहे. जे. पी. न•ा हे आपले गृहराज्य हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत. आता न•ा यांना हिमाचल प्रदेश सोडून इतर कोणत्याही राज्यातून निवडणूक लढवावी लागेल कारण तिथे भाजप आकडेवारीत काँग्रेसपेक्षा पिछाडीवर आहे.

उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10 जागा

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये राजस्थानच्या तीन जागांचा समावेश आहे. या तीन जागांच्या सदस्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपत आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या 10 राज्यसभा जागांवर निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमधून एक जागा समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि 9 जागा भाजपकडे आहेत. भाजप खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्यांमध्ये अशोक वाजपेयी, अनिल जैन, अनिल अग्रवाल, कांता कर्दम, सकलदीप राजभर, जीव्हीएल नरसिंह राव, हरनाथ सिंह यादव आणि विजयपाल तोमर यांचा समावेश आहे. दुसरीकडे, अनिल बलूनी यांचा उत्तराखंडमधील कार्यकाळ संपणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article