For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेच्या धक्क्यातून सावरण्यासाठीच लोकप्रिय घोषणा; महापुरात तरी सापत्न वागणूक नको- सतेज पाटील

12:38 PM Jul 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
लोकसभेच्या धक्क्यातून सावरण्यासाठीच लोकप्रिय घोषणा  महापुरात तरी सापत्न वागणूक नको  सतेज पाटील
Satej Patil
Advertisement

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठीच महायुती सरकारकडून लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत. मात्र, त्यांचा हा सर्व खटाटोप आगामी निवडणुकीसाठीच सुरू असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जनताच त्यांना या धक्क्यातून सावरू देणार नाही, असा दावा माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. सरकारच्या लोकप्रिय घोषणांवर वित्त विभागानेच चिंता व्यक्त केल्याने या सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

आमदार पाटील म्हणाले नदी जवळील अतिक्रमण हे महापालिका क्षेत्राबरोबरच बाहेरचेही आहे. महामार्गाजवळ भराव टाकून अतिक्रमण केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे गांभीर्याने घ्यावे. मागील अनुभव असतानाही ते बांधकाम थांबवू शकले नाहीत, हे दुर्दैवी आहे.

सानुग्रहअनुदान ताबडतोब द्या
सरकारने लोकांपर्यंत मदत पोहोचवणे गरजेचे आहे. उगीच कागदी घोडे नाचवण्यात अर्थ नाही. त्यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

Advertisement

समन्वयामुळे अडचण दूर
अलमट्टीचा विसर्ग वाढवावा अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली. त्यांनीही त्याला प्रतिसाद दिला असून, त्याचा परिणाम दिसत असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला. बेळगाव व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्यात समन्वय सुरू असून यामुळे अडचण येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापुरावेळी तरी सापत्न वागणूक नको
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. निदान महापुरावेळी मदत करताना तरी त्यांनी राज्याला सापत्न वागणूक देऊ नये, आपत्तीत त्यांनी राजकारण करू नये, असा टोला पाटील यांनी लगावला.

हिडकल धरणातील पाण्याबाबतही चर्चा
हिडकल धरणातील पाण्यामुळे गडहिंग्लज व चंदगडमधील काही भागांत समस्या निर्माण होते. या धरणातील पाणीही व्यवस्थित सोडण्याबाबत बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

Advertisement
Tags :

.