For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नियमांचे उल्लंघन करुन पती-पत्नीला निवडणूक ड्युटी

03:36 PM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
नियमांचे उल्लंघन करुन पती पत्नीला निवडणूक ड्युटी
Advertisement

तक्रार करुनही घेतली जात नाही दखल : सरकारी कर्मचारी संघटनेकडून इशारा

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीची ड्युटी ठरविताना एकाच घरातील पती व पत्नी यांना ड्युटी देता येत नाही, हा नियम असून देखील सर्रासपणे या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पती-पत्नीना फार त्रास होतोय. या प्रकरणाची सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीची ड्युटी निश्चित करताना पती व पत्नी सरकारी कर्मचारी वा निमसरकारी कर्मचारी असतील तर दोघांपैकी एकाला माफ करणे आवश्यक असते. मात्र अलिकडे या लोकसभा निवडणुकीत पती व पत्नी या दोघांनाही निवडणूक ड्युटीवर पाठविलेले आहे. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत मांडली तर संबंधित तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन तक्रार मांडा, असे जिल्हा कार्यालयातील अधिकारी सांगतात व तालुका अधिकाऱ्यांकडे तक्रार मांडली तर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात चला व तिथे त्यांच्याकडून मान्यता घ्या, असे सांगून कर्मचाऱ्यांची ससेहोलपट कऊन ठेवली जात आहे. सरकारी कर्मचारी संघटनेकडे या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर म्हणाले की, या कर्मचाऱ्यांना लहान मुले आहेत. त्यांचा विचार कऊन अधिकाऱ्यांनी दोघांपैकी एकाच व्यक्तीला निवडणूक ड्युटी द्यावी. तसेच ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची नोंद घ्यावी अन्यथा आम्हाला मुख्य सचिवांकडे धाव घ्यावी लागेल, असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.