महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूक आयोगाचे ‘मिशन इलेक्शन’ सुरू

06:47 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजपासून राज्यांचा दौरा : पहिल्या टप्प्यात आंध्र-तामिळनाडूतील आढावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात निवडणूक आयोग सोमवार, 8 जानेवारीपासून राज्यांचा दौरा सुरू करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप पांडे आणि अऊण गोयल हे सर्व राज्यांना भेटी देऊन राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत सर्व राज्यांमधील स्थिती जाणून घेतल्यानंतर निवडणुकीच्या तारखा आणि विविध टप्प्यांचे नियोजन करण्यासाठी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू होईल.

निवडणूक आयोग दक्षिणेकडील राज्यांपासून दौऱ्याला सुऊवात करत आहे. 8 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची टीम सुरुवातीला आंध्र प्रदेशला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यातील विधानसभेच्या 175 जागांसाठी आंध्रात निवडणूक होण्याची शक्मयता आहे. आंध्र प्रदेशनंतर तामिळनाडूचा दौरा होणार आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या अनुक्रमे 25 आणि 39 जागा आहेत. आंध्र आणि तामिळनाडूमधील आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयुक्त टप्प्याटप्प्याने पुढील राज्यांचा दौरा सुरू ठेवणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहनिवडणूक आयुक्त सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट देतील की नाही हे अद्याप ठरलेले नाही. नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या राज्यातील आढावा घेण्याची प्रक्रिया झटपट पूर्ण केली जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात उपनिवडणूक आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने यापूर्वीच जवळपास सर्व राज्यांचा दौरा केला आहे. त्यांच्या दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निर्देशानुसार बऱ्याच राज्यांमध्ये जिल्हांतर्गत नियोजनाला सुरुवात झाली आहे. बऱ्याच भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली मतदारांना मतदानयंत्रांचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रियाही पार पडली आहे.

एप्रिल-मेमध्ये निवडणुका शक्मय

निवडणूक आयोगाने राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना 10 मार्चपर्यंत तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर दिल्लीत सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुका यावषी एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्मयता आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीची तारीख 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत सात टप्प्यात निवडणुका झाल्या. त्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी झाली. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, अऊणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या होत्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article