महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूक प्रचार आणि निवडणूक सल्लागार!

06:20 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकींचे निकाल आता लागले आहेत. या निवडणुकीची पूर्वतयारी, राजकारण राजकीय हालचाली, दृश्य-अदृश्य युती-हालचाली, प्रचार पद्धती, सभा-रोड शो याचा साऱ्यांनीच नव्याने परिचय घेतला. नेते-कार्यकर्ते यांनी या निवडणूक प्रचारात रंग भरला. निवडणुकीच्या निकालाने निवडून आलेल्यांना गुलालाचा रंग लागला तर पराभूतांचा बेरंग झाला. हा सारा निवडणुकीचा प्रचार आणि मुख्य म्हणजे प्रचारपद्धती याला यावेळी निवडणूक व्यवस्थापन सल्लागारांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या प्राबल्य दिसून आले हे या निवडणुकांचे वैशिष्ट्या ठरले असून हा एक महत्त्वपूर्ण बदल म्हणावा लागेल.

Advertisement

देशांतर्गत सार्वत्रिक निवडणूक प्रचाराला व्यवस्थापन वा विषयतज्ञांचे पाठबळ मिळण्याची पार्श्वभूमी यानिमित्ताने पडताळून पाहण्यासारखी आहे. इंदिराजींच्या दुर्दैवी हत्येनंतर राजीव गांधी यांनी अचानक व काहीशा अनपेक्षितपणे पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली. त्यावेळी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये त्यावेळचे विक्री-विपणन व्यवस्थापन तज्ञ अरुण सिंह, राजेश पायलट, माधवराव शिंदे यासारख्यांचा समावेश होता.

Advertisement

त्यापैकी अरुण सिंह हे तर जाहिरात विषयातील तज्ञ समजले जात. त्यांनी राजीवजींच्या मैत्रीपोटी आपल्या बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रतिष्ठित नोकरीचा राजीनामा देऊन राजीव गांधींना साथ आणि काँग्रेसला हात दिला. राजीव गांधी यांनीपण आपली मैत्री व विक्री-व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पकतेचे महत्त्व जाणून अरुण सिंह यांनी सूचविलेल्या नवे संदर्भ आणि वैशिष्ट्यांसह असणाऱ्या निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींचा वापर करण्याचा मोठा व धाडसी निर्णय घेतला.

यातूनच देश आणि समाजाला विळखा घालणाऱ्या साप-विंचू यांच्यासह असलेल्या विशेषत: वृत्तपत्रीय जाहिराती त्यावेळच्या वाचक-पिढीला आजही आठवतील. इंदिराजींच्या हत्येची पार्श्वभूमी, देशाला भेडसावणारी दहशतवाद व हिंसाचाराची समस्या, त्याचदरम्यान झालेले शीख बांधवांचे प्रचंड शिर्काण या भीषण व भयावह स्थितीच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या जाहिराती तत्कालिन भारतीय जनमानस व मतदारांना भावल्या व त्यावेळी काँग्रेसला त्या विशेष आणि विशिष्ट परिस्थितीत फार मोठे बहुमत मिळाले, हा इतिहास आहे. भारतातील निवडणूक व प्रचारात व्यावसायिक जाहिरातींचा उपयोग त्यावेळी प्रथमच झाला व एक नवी व्यवसायवाट त्यानिमित्ताने सापडली.

त्यानंतरच्या काळात म्हणजेच 90 च्या दशकात जस-जसा दृकश्राव्य माध्यमांचा वापर आणि प्रसार-प्रचार वाढू लागला तसतसा निवडणूक प्रचारावर पण दृकश्राव्य माध्यमांचा प्रभाव पडू लागला. या प्रचार माध्यमांचा थेट आणि अधिक प्रभावी वापर करण्यासाठी व वाढत्या वाहिन्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रचार व जाहिरातींच्या जोडीलाच चर्चा-विश्लेषणांची जोड दिली जाऊ लागली. लवकरच त्याला निवडणूकपूर्व व मतदानोत्तर सर्वेक्षण-चर्चा, विश्लेषणांवर भर दिला जाऊ लागला. यातूनच सर्वेक्षण-विश्लेषणाचे काम करण्याचा व्यावसायिक कंपन्यांना मोठा लाभ होऊ लागला व त्याचे सद्यस्वरुप आता सर्वमान्य ठरले आहे.

राजकीय पक्ष-निवडणूक प्रचार, विशेष व्यक्तींसाठी संपर्क-जनसंपर्कासह प्रसिद्धी या बाबी याच दरम्यान वाढीस लागल्या. त्यासाठी प्रस्थापित व व्यावसायिक संस्था सुरु झाल्या व वाढीस लागल्या. जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रातील तज्ञांशिवाय प्रत्यक्ष संपादन-पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्ती अशा कामांमध्ये रुची घेण्यासोबतच आपला अनुभव व कौशल्यावर आधारित राजकारणी आणि पुढाऱ्यांसाठी प्रत्यक्ष वा पर्यायी स्वरुपात काम करु लागल्या व त्याचा लाभ पुढारी आणि पत्रकार या उभयतांना होण्याची नवी प्रथा-परंपरा सुरू झाली जी आजतागायत सुरु आहे.

यातूनच राजकीय पक्ष-उमेदवार, निवडणुकीचा प्रचार इ. कामे व्यावसायिक स्वरुपात करण्याची पद्धत सुमारे 10 वर्षांपूर्वी सुरू झाली. एक विषय तज्ञच नव्हे तर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन सल्लागार म्हणून औपचारिक स्वरुपात काम करणारे निवडणूक प्रचार व्यवस्थापन तज्ञ म्हणून प्रामुख्याने नाव घेतले जाते ते प्रशांत किशोर यांचे. प्रशांत किशोर यांनी कुठलाही व्यक्ती वा पक्षानिमेश न बाळगता राजकीय प्रचार व निवडणूक व्यवस्थापन तज्ञ म्हणून आपले नाव तर निर्माण केलेच, शिवाय नावलौकिकही प्राप्त केला. हा इतिहास तसा ताजा आहे.

नव्या संदर्भातील राजकारण आणि मुख्य म्हणजे निवडणुकांचे व्यावसायिक स्वरुपात तज्ञ सल्लागार म्हणून काम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी प्रशांत किशोर यांची निवड केली. या निर्णयाचा आणि निवडीचा फायदा उभयतांना झाला. परिणामी भाजपासह नरेंद्र मोदींना झाला.

प्रशांत किशोर यांच्या परिस्थितीनुरूप व तत्कालीन गरजा लक्षात घेता त्यांनी तयार केलेल्या घोषणांची नेहमीच चर्चा होते. 2014 मध्ये तत्कालीन भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींना प्रचारीत करताना ‘घर-घर मोदी-हर घर मोदी’ ही घोषणा नवी व म्हणूनच नकोशी वाटली असली तरी नेमकी हीच घोषणा व त्यामागची लोकभावना प्रभावी व परिणामकारक ठरली. त्याचा प्रत्यय सर्वांना आला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने व व्यावसायिक स्वरुपात राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे काम करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी स्वत:ची इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी (आय-

पॅक) नावाची व्यावसायिक संस्था स्थापन केली. व्यवस्थापनाच्या संदर्भात चोखंदळ असणाऱ्या प्रशांत किशोर यांनी ठरवून व विचारपूर्वक स्वरुपात आयआयटी-इंडियन इन्स्टिट्युट ऑफ

टेक्नॉलॉजी व आयआयएम-इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या प्रथितयश संस्थांमधील हुशार व इच्छुक उमेदवारांचीच निवड करण्याची काळजी घेतली, हे विशेष.

प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित व त्यांच्याद्वारा प्रशिक्षित निवडणूक व्यवस्थापन सल्लागारांचा गोषवारा पुढीलप्रमाणे सांगता येईल-

सुनील कनुगोलू : ‘आय-पॅक’मधील प्रशांत किशोर यांचे अनुभवी सहकारी. निवडणूक प्रचार व्यवस्थापन सल्लागार म्हणून भाजप, द्रविड मुन्नेत्र कळघम व एआयडीएमकेसाठी यशस्वीपणे काम केल्यावर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत म. प्र. काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापक म्हणून काम केले.

नरेश अरोरा : ‘डिझाईन बॉक्सड’ कंपनीत 2011 मध्ये कारकीर्दीची सुरूवात. 2015 पासून निवडणूक प्रचार व्यवस्थापन क्षेत्रात सक्रिय. त्यावेळी काँग्रेसच्या प्रचारासाठी पंजाब व हिमाचलमध्ये काम केलेले. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रचाराचे नियोजन केले. राजस्थानच्या विधानसभा प्रचारासाठी सचिन पायलट व अशोक गेहलोत यासारख्या दिग्गज्जांसाठी विशेषत्वाने काम केले.

रॉबिन शर्मा : एमबीए प्रशिक्षित व प्रशांत किशोर यांच्या आय-पॅकचे सहसंस्थापक. आंध्रमध्ये जगनमोहन रे•ाr व चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय मेघालयात कोनार्ड संगमा यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली.

हिमांषू सिंह : आय-पॅकमध्ये निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे काम केल्यावर स्वत:ची वेगळी निवडणूक प्रचार सल्लागार कंपनी स्थापन केली. भाजपच्या प्रचार यंत्रणेशी संबंधित असून त्यांच्या ‘नेशन फॉर नमो’, ‘माय फर्स्ट वोट फॉर मोदी’ या उपक्रमांची विशेष चर्चा झाली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी म. प्र व राजस्थानमध्ये काम केले.

ऋषीराज सिंह, विनित चंडेल व प्रतिक जैन: या उत्साही तज्ञ त्रयीने पण आय-पॅकमध्ये काम केल्यानंतर 2020 च्या दिल्ली निवडणुकीत आपच्या अरविंद केजरीवाल ‘अच्छे बीते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ या आकर्षक घोषणेसह काम केले. त्यापूर्वी आंध्रप्रदेशात जगनमोहन रे•ाRसाठीपण या तिघांनी काम केले होते.

प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केलेले. यापैकी प. बंगालमध्ये अत्यंत आव्हानपर परिस्थितीत तृणमूलला विजय मिळाला तर प्रशांत किशोर असतानासुद्धा तृणमूलला गोव्यामध्ये सपशेल पराभवाला सामोरे जावे लागले.

यावर पंजाब काँग्रेसचे प्रभारी मनीष तिवारी यांचे मत व प्रतिक्रिया अभ्यासनीय ठरते. त्यांच्या मते राजकारणासह निवडणूक प्रचाराला व्यवस्थापन तज्ञांची मते राजकारणासह निवडणूक प्रचाराला व्यवस्थापन तज्ञांची साथ मिळाल्यास ते निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. याच या विषयतज्ञांचा केव्हा, कुठे, कसा, कितपत व कां म्हणून उपयोग करावा याचे भान संबंधित राजकीय पक्षपुढाऱ्यांनी ठेवणे गरजेचे ठरते. दुसरी बाब म्हणजे पक्ष-पुढारी व व्यवस्थापन तज्ञ यांचा संपूर्ण समन्वय असावा लागतो व तसे झाले नाही तर विपरीत परिणामसुद्धा दिसून येतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने ही बाब नव्याने व नव्या संदर्भात अधोरेखित झाली आहे.

-दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article