Kolhapur : रूईकर कॉलनीत वृद्ध महिलेची चेन लंपास !
कोल्हापुरात वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास
कोल्हापूर : वृद्ध महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची चेन मोपेडवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रुईकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. याबाबतची फिर्याद प्रमोदिनी प्रतापराव हवालदार (वय ७८ रा. परांजपे स्किम रुईकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोदिनी हवालदार या शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्रमोदिनी हवालदार या बाहेर फिरुन आपल्या फ्लॅटमध्ये निघाल्या होत्या. यावेळी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारची कडी काढत असताना, पाठीमागून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची चेन हिसडा मारुन लंपास केली. यामध्ये प्रमोदिनी तोल जाऊन खाली पडल्या. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी मोपेडवरुन धुम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दोन संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद
दरम्यान इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये दोन संशयित जेरबंद झाले आहेत. पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पैंट आणी तोंडाला मास्क लावलेल्या तरुणाने वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन लंपास केली. तर मोपेड चालविण्यासाठी बसलेल्या तरुणाने हेल्मेट परिधान केले होते.