कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Crime : गिजवणे गावात वृद्धेवर हल्ला ; पोलिस तपास सुरू

12:48 PM Nov 09, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                          गडहिंग्लजमध्ये घरफोडीचा थरार

Advertisement

गडहिंग्लज : गिजवणे येथील पाटील गल्लीत अज्ञाताने अक्कमहादेवी बाबासाहेब उर्फ बी. एन. पाटील या वृध्देवर हल्ला करून रोख १५ हजार रूपये लांबवल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि या घटनेसंबंधीत इतर तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

Advertisement

शुक्रवारी या प्रकरणाची फिर्याद जखमी सौ. अक्कमहादेवी पाटील यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. कुरिअरवाला आल्याचे सांगत चोरट्याने बंगल्यात हेल्मेट, मास्क घालून प्रवेश केला होता. मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश करताच सौ. अक्कमहादेवी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यावेळी त्याच्या हातातील बांगड्या, कानातील आणि गळ्यातील सोने काढून घेण्याचा प्रयत्न करताना त्या जखमी होऊन तिथेच पडल्या.

तेथे मोठा रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. यावेळी चोरट्याने बेडरूममध्ये असणाऱ्या तिजोरीतील रोख १५ हजार रूपये घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसाकडून शुक्रवारी रात्री उशिरा ठसेतज्ज्ञ आणि कोल्हापूराहून डॉ गस्कॉडच्या पथकाला पाचारण केले होते. डॉग स्कॉडने घरातून मुख्य रस्त्यापर्यत माग काढला. त्यानंतर शनिवारी दिवसभर या घटनेसंबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

 

Advertisement
Tags :
#kolhapurnews#maharashtrapolice#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaCCTVInvestigationgadhinglajRobberyCaseSeniorCitizenAttack
Next Article