महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणातील सर्वात धनाढ्या उमेदवार

05:57 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजगोपाळ रेड्डीकडे 458 कोटी रुपयांची संपत्ती

Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे. उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार 458 कोटी रुपयांच्या संपत्तीसह काँग्रेसचे कोमाटिरेड्डी राजगोपाळ रेड्डी हे राज्यातील सर्वात धनाढ्या उमदेवार ठरले आहेत.

Advertisement

नलगोंडा जिल्ह्यातील मुनुगोड मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या राजगोपाळ रेड्डी यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:ची कौटुंबिक संपत्ती 458.37 कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे 297.36 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. तर यात रोख रक्कम, बँकेतील ठेवी, 239.91 कोटी रुपयांचे मूल्य असणारे सुशी इन्फ्रा अँड मायनिंग लिमिटेडचे समभाग सामील आहेत. त्यांच्या पत्नी के. लक्ष्मी यांच्याकडे 4.18 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे.

राजगोपाळ रेड्डीकडे 108.23 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. तर पत्नीकडे 48.60 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. यात कृषी अणि बिगरशेती जमीन तसेच वाणिज्यिक इमारत सामील आहे.

4.14 कोटी रुपयांचे कर्ज

रेड्डीवर एकूण 4.14 कोटी रुपयांचे कर्ज आहे. 2022-23 मध्ये त्यांचे उत्पन्न 71.17 कोटी रुपये राहिले आहे. तर 2021-22 मध्ये हा आकड सुमारे 1.52 कोटी रुपये इतका होता. सुशी इन्फ्रा अँड मायनिंग लिमिटेडला विविध राज्यांमध्ये 16 कंत्राटं मिळाल्याचा तपशील प्रतिज्ञापत्रात नमूद केला आहे.

2018 नंतर 45 टक्क्यांची वाढ

2018 नंतर राजगोपाळ यांच्या संपत्तीत 45 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 2018 मधील निवडणुकीवेळी त्यांनी स्वत:ची संपत्ती 314 कोटी रुपये घोषित केली होती. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस नेत्याने 66 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

पैला शेखर रेड्डी दुसऱ्या स्थानी

सत्तारुढ बीआरएसचे नेते पैला शेखर रेड्डी हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्या उमेदवार आहेत. ते भोंगिर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे एकूण 227 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शेखर रेड्डी हे रियल इस्टेट उद्योगाशी निगडित आहेत.

तर तिसऱ्या क्रमांकावर दुब्बाक येथील बीआरएस उमेदवार प्रभाकर रेड्डी आहेत. त्यांच्याकडे 197 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article