For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या प्रचारासाठी शहा, शिंदे बेळगावात येणार

01:15 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या प्रचारासाठी शहा  शिंदे बेळगावात येणार
Advertisement

बेळगाव : बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेळगावमध्ये येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर प्रचारसभेनंतर आता दोन दिग्गज भाजपच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निपाणी, बेळगाव व खानापूर येथे सभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवार दि. 3 मे रोजी चिकोडी लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत. संकेश्वर येथे त्यांची सभा होणार असून बुधवारी दुपारपर्यंत दौऱ्याबाबतची संपूर्ण निश्चिती केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांची बेळगावमध्ये जाहीर सभा झाल्यानंतर आता अमित शहा यांची चिकोडी लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. यासाठी भाजप कार्यकर्ते जय्यत तयारीला लागल्याची माहिती भाजप माध्यम प्रमुखांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. 2 रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बेळगावसह चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा घेतली जाणार आहे. याबरोबरच खानापूर व निपाणी येथेही जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बेळगावात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.