महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अठरा दिवस दसरोत्सवाची सुटी जाहीर

11:40 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3 ते 20 ऑक्टोबरपर्यंत सुटी : गांधी जयंतीला शाळा स्वच्छतेचे आदेश

Advertisement

बेळगाव : यावर्षी दसरोत्सवासाठी एकूण 18 दिवसांची सुटी शाळांना मिळणार आहे. दि. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दसरोत्सवाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. सध्या परीक्षा संपल्या असून पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या सुटीनंतरच विद्यार्थ्यांना परीक्षांचे निकाल दिले जाणार आहेत. 23 सप्टेंबरपासून सहामाही परीक्षांना प्रारंभ झाला. सुरुवातीला कला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव विषयांचे पेपर झाले. त्यानंतर विषयांचे पेपर घेण्यात आले. प्राथमिक विभागासोबतच माध्यमिक विभागाच्याही परीक्षा घेण्यात आल्या. सोमवारी समाज विज्ञान विषयाचा शेवटचा पेपर पार पडला. मंगळवारी विद्यार्थ्यांना सुटीचा अभ्यास दिला जाणार असून बुधवारी महात्मा गांधी जयंती आहे.

Advertisement

पालकांनी किमान एक तरी झाड लावण्याची सूचना

महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवार दि. 2 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मध्यान्ह आहार घेणाऱ्या विद्याथ्यर्च्यां पालकांनी किमान एक तरी झाड लावण्याची सूचना केली आहे. शहरात शाळांचा परिसर लहान असल्यामुळे आपल्याला शक्य होईल तेथे वृक्षारोपण करावे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शाळांनाही अधिकची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article