For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठ वर्षीय शाळकरी मुलीवर वृध्दाकडून बलात्कार

05:18 PM Mar 17, 2025 IST | Radhika Patil
आठ वर्षीय शाळकरी मुलीवर वृध्दाकडून बलात्कार
Advertisement

सांगली  :

Advertisement

मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी ६५ वर्षीय नराधम वृद्धास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष उर्फ भैय्या गोविंद कांबळे असे त्याचे नाव आहे. २६ फेब्रुवारी ही घटना घडली. पीडितेच्या आजीने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, जत तालुक्यातील घटनेनंतर ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षितेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडितेला ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतले आहे. मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे. संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो. तो मोलमजुरी करत असून २६ फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती. संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलवून घेतले. तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडिता घरी गेली. त्याला त्रास जाणवून लागल्याने रडू लागली.

Advertisement

पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले. परंतु अधिकचा त्रास होवू लागल्याने रुग्णालयात दाखवण्यात आले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात बालकाचे लैंगिक अपराधापारसून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.