For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्र प्रदेशात आठ आमदार अपात्र घोषित

06:07 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंध्र प्रदेशात आठ आमदार अपात्र घोषित
Advertisement

वृत्तसंस्था / विशाखापट्टणम

Advertisement

आंध्र प्रदेशात आठ आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. ही कठोर कारवाई राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष तम्मीनेगी सीताराम यांनी केली आहे. या आठ आमदारांमध्ये सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाचे चार तर विरोधी तेलगु देशम पक्षाचे चार आमदार यांचा समावेश आहे. हे आमदार पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते असे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष सीताराम यांनी नंतर दिले आहे.

यासंबंधीची याचिका आंध्र प्रदेशात सत्ताधारी असणाऱ्या युवजन श्रमिक रयथू काँग्रेस पक्षाने (वायएसआर काँग्रेस) सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. हे सर्व आमदार स्वपक्षाचा विश्वासघात करीत होते आणि अन्य पक्षाशी निष्ठा दर्शवित होते, असा आक्षेप नोंदविण्यात आला होता, असे प्रतिपादन विधानसभाध्यक्षंनी केले.

Advertisement

सत्ताधाऱ्यांचे चार आमदार

अनम रामनारायण रेड्डी , मेकापती चंद्रशेखर रेड्डी , कोटाम श्रीधर रेड्डी आणि उंदावल्ली श्रीदेवी या चार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याची तक्रार सादर करण्यात आली होती. अशाच प्रकारची याचिका तेलगु देशम पक्षानेही त्याच्या चार आमदारांविरोधात सादर केली होती, अशी माहिती देण्यात आली.

तेलगु देशमचे चार आमदार

महलागिरी, कारणम बलराम, वल्लभनेनी वामसी आणि वासुपल्ली गणेश या तेलगु देशमच्या चार आमदारांविरोधातही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी याचिका सादर केली होती. चौकशीअंती ते पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे आढळल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली.

Advertisement
Tags :

.