कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फटाके कारखाना स्फोटात तामिळनाडूत आठ ठार

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /शिवकाशी

Advertisement

तामिळनाडूतील शिवकाशीजवळ एका फटाक्मयांच्या कारखान्यात गुऊवारी स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी अग्नितांडव निर्माण झाले. या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच या अपघातात अन्य 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. स्फोटामागील कारण तपासले जात आहे. कारखान्यात आग लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांची धावपळ उडाली. आग पसरू नये यासाठी वेळीच सावधगिरी घेण्यात आली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून आग नियंत्रणात आणण्यात आली. दुर्घटना घडलेल्या कारखान्याकडे फटाके बनवण्याचा परवाना असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. शिवकाशी हे शहर भारतातील फटाके उत्पादन कारखान्यांसाठी ओळखले जाते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article