For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषक अंतिम स्पर्धेसाठी आठ भारतीय नेमबाज पात्र

06:36 AM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषक अंतिम स्पर्धेसाठी आठ भारतीय नेमबाज पात्र
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरसह आठ भारतीय नेमबाजांनी 4 ते 9 डिसेंबर दरम्यान कतारमधील दोहा येथे होणाऱ्या हंगामाच्या अखेरच्या आयएसएसएफ विश्वचषक अंतिम स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.

भाकर ही एकमेव भारतीय नेमबाज आहे जिने 12 वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धांपैकी प्रत्येकी हंगामातील सर्वोत्तम नेमबाज ठरवणाऱ्या आयएसएसएएफ शोपीससाठी महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल आणि महिलांच्या 25 मी. पिस्तुल या दोन स्पर्धांमध्ये स्थान मिळवले आहे. त्या 12 स्पर्धांपैकी पाच स्पर्धांमध्ये ती भारताची प्रतिनिधी असेल. ब्यूनास आयर्स, लिमा आणि म्युनिकमध्ये सलग तीन सुवर्णपदके जिंकून महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुलमध्ये वर्चस्व गाजवणारी किशोरवयीन सुरुची सिंग केवळ दोहासाठी पात्र ठरली नाही तर महिलांच्या एअर पिस्तुलमध्ये जगात नंबर 1 रँकही मिळवली.World Shooting Championships in October

Advertisement

ऑलिम्पिक ईशा सिंगने चीनमधील निंग्बो येथे झालेल्या चौथ्या आणि अंतिम आयएसएसएएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकून महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल स्पर्धेतही पात्रता मिळवली. पात्रता मिळवणाऱ्या इतर खेळाडूंमध्ये माजी विश्वविजेता रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे. ज्याने ब्युनोस आयर्समध्ये सुवर्णपदक जिंकून पुरूषांच्या 10 मी. एअर रायफलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते तर ऑलिम्पियन अर्जुन बाबूताने लिमामध्ये रौप्यपदक जिंकून त्याच स्पर्धेत आपली उपस्थिती निश्चित केली होती. विद्यमान आशियाई विजेती आणि विश्वविक्रम धारक सिफ्ट कौर समरानेही ब्युनोस आयर्समध्ये सुवर्णपदकासह महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन (3पी) स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. तर सहकारी ऑलिम्पियन विजयवीर सिद्धूने त्याच ठिकाणी सुवर्णपदक जिंकून पुरूषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

भारताच्या पात्रता यादीत सिमरनप्रीत कौर ब्रार आहे. जिने लिमामध्ये रौप्यपदकासह महिलांच्या 25 मी. पिस्तुलमध्ये प्रवेश मिळवला होता. कारण चीनची सून युजीने आधीच ब्युनोस आयर्समध्ये सुवर्णपदक जिंकून आपले स्थान निश्चित केले होते. आयएसएसएफने विश्वचषक अंतिम फेरीतील पदक विजेत्यांसाठी बक्षीस रक्कम देखील निश्चित केली आहे. सुवर्णपदक विजेत्यांना 5000 युरो, रौप्यपदक विजेत्यानां 4000 युरो आणि कांस्यपदक विजेत्यांना 2000 युरो मिळतील.

भारतीय खेळाडूंना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ग्रीसमधील अथेन्स येथे होणाऱ्या आगामी आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद शॉटगन आणि इजिप्तमधील कैरो येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद रायफल, पिस्तुलमध्ये पदक जिंकून अंतिम फेरीत पात्रता मिळवण्याची संधी आहे. 2025 मध्ये ब्यूनस आयर्स, लिमा, म्युनिक आणि निंग्बो येथे झालेल्या रायफल, पिस्तुलच्या चार विश्वचषक टप्प्यामध्ये भारताची एकूण मोहीम तसेच निकोसिया आणि लोनाटो येथे स्वतंत्र शॉटगन विश्वचषक टप्प्यासह आतापर्यंतची सर्वात मजबूत मोहीम होती. 2025 मध्ये भारताने त्यांच्या सर्वोत्तम विश्वचषक हंगामांपैकी एक अनुभवला. ज्यामध्ये रायफल, पिस्तुल आणि शॉटगन विषयांमध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्यपदकांसह एकूण 22 पदके जिंकली आणि एकूण दुसरे स्थान पटकाविले.

Advertisement
Tags :

.