Agri News: आठ एकर पडीक जमिनीचा वापर, तीन महिलांनी डोंगरात फुलवली बाग
पाण्यासाठी शासनाच्या फलोत्पावन योजनेतून सूक्ष्म ठिबक सिंचन केले आहे
By : विजय पाटील
सरवडे : गतवर्षीपासून काही झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली असून पुढील हंगामात सर्व झाडांना फळे लागतील, असा आशावाव व्यक्त केला आहे. शासनाच्या योजनेतून केलेली राधानगरी तालुक्यातील मोठी यशस्वी फळबाग आहे.
मौजे कासारवाडा (पाटणकर) येथील लतावेवी संजय जाधव, राजकुँवर धनंजय जाधव आणि वीपकुँवर उत्तम जाधव या तीन महिलांनी आपल्या ८ एकर क्षेत्रामध्ये फळ झाडाच्या लागवडीचा निर्णय घेतला. प्रथमतः डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण केले. त्यानंतर
आजरा आणि वेंगुर्ला येथील शासनमान्य रोपवाटिकेतून आंबा नारळ काजू, चिकू या झाडांची १२०० रोपे आणली. इस्त्रायल पध्वतीने १५ फुटाच्या अंतराने आआंबा व २० फुट अंतराने २ बाय वोनच्या खड्ड्यात काजूची झाडे जून २०२२ मध्ये लावली. यामध्ये काजू ४००, आबा ७०० व नारळ, चिक्कू १०० झाडांचा समावेश आहे. ही झाडे आता ३ वर्षाची झाली आहेत.
झाडांच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात गांडूळ खत आणि अल्प प्रमाणात रासायनिक खते वेण्यात आली. वेळोवेळी औषध फवारणी केली. काजू उत्पावनास मागील वर्षात सुरवात झाली असून यावर्षी ४०० पैकी ३९० झाडांना फळे लागली तर आंब्याच्या ५० झाडांना यावर्षी फळे लागली. यापुढे सर्व झाडांपासून फळे मिळण्यास सुरुवात होईल.
पाण्यासाठी शासनाच्या फलोत्पावन योजनेतून सूक्ष्म ठिबक सिंचन केले आहे. यासाठी शासनाकडून एकूण खर्चाचे ८० टक्के अनुवान तसेच काजू झाडासाठी प्रती झाड ६० रुपये आणि आंबा झाडासाठी ८० रुपये अनुवान मिळाले. त्याबरोबर मजुरी, खतापोटी असे एकूण ५ लाख पर्यंत अनुवान प्राप्त मिळाले.
या महिलाना जिल्हा कृषी अधीक्षक कृषी जालंवर पांगरे, उप विभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारविवे, तालुका कृषी अधिकारी श्रुती नलवडे, पर्यवेक्षक विलीप आवमापुरे, कृषी सहाय्यक चौगले, तंत्र अधिकारी सूर्यकांत मगदूम यांचे मार्गवर्शन व कुटुंबीयाचे सहकार्य लाभले.
यशस्वी फळबाग लागवड
शासनाच्या योजना चांगल्या असून त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे. आमच्या डोंगराळ जमिनीत फळबाग करण्याचा निर्णय घेतला. फार मोठे कष्ट घेऊन डोंगर जमिनीचे सपाटीकरण केले. ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली. आणि १२०० फळझाडे लावली.
चांगली देखभाल केल्याने झाडे योग्य पध्दतीने वाढली आहेत. अनेक झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. पुढील हंगामात सर्व झाडे फळे देतील. केवळ गवत पिकणाऱ्या या जमिनीतून केवळ ७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. फळबागेमुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
- सी. राजकुँवर धनंजय जाधव, प्रगतशील महिला शेतकरी.