For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इजिप्तने शोधले राजा थुतमोस द्वितीयचे अवशेष

06:53 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
इजिप्तने शोधले राजा थुतमोस द्वितीयचे अवशेष
Advertisement

‘जंगलांचा राजा’ असे टोपणनाव, पुजाऱ्यांनी गुप्त ठिकाणी केले होते दफन

Advertisement

इजिप्त स्वत:च्या ममींसाठी प्रख्यात आहे, देशात दर काही दिवसांनी जुन्या राज्यांच्या थडग्यांचा शोध लागत असतो. यामुळे तेथील इतिहासाविषयी दुर्लभ माहिती मिळत राहते. आता इजिप्तमध्ये पुरातत्व तज्ञांनी किंग थुतमोस द्वितीयचे थडगे शोधल्याचा दावा केला आहे. राजा थुतमोस द्वितीयने 1493 ते 1479 ख्रिस्तपूर्व काळापर्यंत इजिप्तमध्ये राज्य केल्याचे मानले जाते. तुतनखामुन मकबऱ्याच्या शोधाच्या सुमारे 100 वर्षांनी एखाद्या राजघराण्याच्या राजाच्या थडग्याचा शोध लागला आहे.

इजिप्तच्या सुप्रीम कौन्सिलचे सेक्रेटरी जनरल डॉ. मोहम्मद इस्माइल खालिद यांनी अलिकडच्या दशकांमधील हा सर्वात महत्त्वपूर्ण शोध असल्याचे म्हटले आहे. या शोधामुळे इजिप्तच्या इतिहासावरून अशी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यापासून आधुनिक जग अजाण आहे. राजा थुतमोस द्वितीयच्या राजघराण्याच्या जंगलांचा रक्षक किंवा जंगलांचा राजा म्हटले जात होते. पुरातत्व तज्ञांनुसार या राजघराण्याच्या शवांना पुजाऱ्यांनी दरोडेखोरांपासून वाचविण्यासाठी अज्ञात ठिकाणी दफन केले होते.

Advertisement

2022 मध्ये लक्सरमध्ये एका ब्रिटिश रिसर्च फौंडेशनच्या सहकार्याने सुप्रीम कौन्सिलसाठी एंटीक्विटीटीजसाठी उत्खनन करण्यात आले होते. यादरम्यान सी4 या थडग्यासाठी एक प्रवेशमार्गाची ओळख पटविण्यात आली होती. थडग्याच्या काही हिस्स्यांमध्ये थुतमोस द्वितीय आणि त्याची पत्नी राणी हात्सपसुतच्या नावावर नोंद आहेत. यामुळे याच ठिकाणी राजाला दफन करण्यात आल्याचे सिद्ध होते. थुतमोस द्वितीयने स्वत:च्या सावत्र बहिणीशी विवाह केला होता आणि त्याच्या थडग्याला सुरक्षितप्रकारे त्याच्या पत्नीच्या देखरेखीत दफन करण्यात आले होते असे संशोधकांचे मानणे आहे.

इमिडवाट हे एक प्राचीन इजिप्तच्या अंत्यंसंस्काराविषयीचे पुस्तक मिळाले असून याची अनेक पानं आणि काही दस्तऐवज सुरक्षित स्वरुपात प्राप्त करण्यात आले आहेत. हे दस्तऐवज पिवळ्या रंगाचे असून त्यांना राजासोबतच थडग्यात दफन करण्यात आले होते. हे थडगे लक्सरच्या पश्चिमेतील राज्याच्या पत्नींपैकी एकीचे असू शकते असा अनुमान प्रारंभी संशोधकानी व्यक्त केला होता. परंतु हे शव राजाचे होते असे आता कळले आहे.

वैज्ञानिकांनी सुमारे तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या शोधाल सिद्ध करण्यास यश मिळविले आहे. राजाचे थडगे थुतमोस तृतीच्या पत्नी आणि इजिप्तची एकमात्र महिला फिरौन राणी हत्शेपसुतच्या थडग्यानजीक होते, यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. थुतमोस द्वितीय इजिप्तच्या 18 व्या राजघराण्याचा फिरौन होता.

Advertisement
Tags :

.