कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न

06:16 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कामगार मंत्री संतोष लाड यांच्याकडून मदतकार्य : मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरुप परत आणण्यासाठी कामगार मंत्री संतोष लाड व इतर अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहेत. संतोष लाड यांनी पहलगाम व इतर ठिकाणी अडकून पडलेल्या राज्यातील पर्यटकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 45 पेक्षा अधिक पर्यटक काश्मीरमध्ये असून विशेष विमानाने त्यांना एक-दोन दिवसात परत आणले जाणार आहे.

बागलकोट येथील 11, कोप्पळ येथील 13, उडुपीतील 20, गदगमधील 2, विजापूरमधील 3 व इतर जिल्ह्यांमधील पर्यटकांना सुखरुपपणे परत आणले जाणार आहे. मदतकार्यासाठी मंत्री संतोष लाड मंगळवारी रात्रीच श्रीनगरला पोहोचले. त्यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या कार्याची माहिती दिली. तसेच मंजुनाथ, भूषण व मधूसुदन यांचे पार्थिव असलेल्या हॉस्पिटला भेट देऊन मृतदेह नातेवाईकांकडे हस्तांतर करण्यास मदत केली. अधिकाऱ्यांच्या मदतीने विशेष विमानाने हे पार्थिव राज्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मृतांमध्ये कर्नाटकातील तिघांचा समावेश

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील तीन पर्यटकांच मृत्यू झाला आहे. शिमोग्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक मंजुनाथ बेंगण्tरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि मधूसुदन हे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडले आहेत. बेंगळूरच्या राममूर्तीनगर येथे वास्तव्यास असलेले मधूसुदन हे मुळेचे आंध्रप्रदेशाच्या नेल्लूर येथील आहेत. 15 वर्षांपूर्वी ते बेंगळुरात वास्तव्यास आले होते. रविवारी ते पत्नी व दोन मुले तसेच मित्रांसोबत काश्मीरला गेले होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर भरत भूषण हे देखील पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलांसोबत पाच दिवसांपूर्वी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. दहशतवाद्यांपासून बचावासाठी ते मुलांसोबत दाट झाडीत लपले होते. मात्र, दहशतवाद्यांनी शोध घेऊन त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. शिमोग्यातील बांधकाम व्यावसायिक मंजुनाथ हे मुलाला बारावी परीक्षेत 97 टक्के गुण मिळाल्याच्या आनंदात फिरण्यासाठी पाच दिवसांपूर्वी पत्नी व मुलासोबत काश्मीरला गेले होते.

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील व्यक्तींच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शिमोग्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक मंजुनाथ आणि बेंगळूरमधील सॉफ्टवेअर अभियंता भरत भूषण यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फोनवरून सांत्वन केले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक 10 लाखांची मदत जाहीर केली.

मंजुनाथ यांचे पार्थिव आज शिमोग्यात

दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या मंजुनाथ यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी विशेष विमानाने बेंगळुरात दाखल होणार आहे. नंतर रस्तेमार्गाने ते शिमोग्यात आणले जाईल, अशी माहिती भाजप आमदार चन्नबसप्पा यांनी दिली. दुपारी 1 वाजता मंजुनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी अंत्यसंस्कारात सहभागी होतील, असेही एस. एन. चन्नबसप्पा यांनी सांगितले.

आज शिमोगा बंद

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात बांधकाम व्यावसायिक मंजुनाथ यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार 24 रोजी ‘शिमोगा बंद’ची हाक देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत आमदार चन्नबसप्पा यांनी ही माहिती दिली.  त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी अर्धा दिवस दुकाने, व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article