For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न

11:31 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची माहिती : रिंगरोड-रखडलेल्या प्रकल्पांबाबत घेतला आढावा

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमानतळासाठी 14 एकर अतिरिक्त जागा घेतली जाणार आहे. एअर फोर्ससोबत जागेसाठी चर्चा सुरू असून लवकरच नवीन टर्मिनल बिल्डिंगही तयार केली जात आहे. त्यामुळे जुन्या टर्मिनल बिल्डिंगचा वापर कार्गो सेवेसाठी होणार असल्याने बेळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.

बेळगावमधील विमानतळ, रेल्वे, महामार्ग यासंदर्भात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेट्टर यांनी माहिती दिली. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनासाठी प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. भूसंपादन लवकर पूर्ण करावे यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर विमानतळावरील नव्या टर्मिनलचे 30 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 2025 पूर्वी पूर्ण केले जाणार आहे.

Advertisement

रिंगरोडच्या कामाला ऑक्टोबरपासून सुरुवात 

बेळगाव शहराभोवती असलेल्या रिंगरोडचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडले आहे. जमीन संपादनाचे काम अद्याप सुरू असून ऑक्टोबरपासून रिंगरोडच्या कामाला गती दिली जाणार आहे. बेळगावमध्ये रखडलेल्या सर्वच प्रकल्पांना येत्या काही दिवसात गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विमानतळाचे संचालक त्यागराजन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.