For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यभरातील एसटी सेवेवर परिणाम ! कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन

11:59 AM Sep 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
राज्यभरातील एसटी सेवेवर परिणाम   कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन
Advertisement

जिल्ह्यातील 12 डेपोतही निदर्शन : ऐन गणेशोत्सवामध्येच आंदोलन : कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गोची : मुख्यमंत्र्यासोबत होणाऱ्या आजच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा

कोल्हापूर प्रतिनिधी

राज्य शासानाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह अन्य मागण्यासाठी एस. टी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. कोल्हापूरामध्ये विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. एस.टी. कर्मचाऱ्यांना शासानाप्रमाने वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता फरक मिळावे, वार्षिक वेतन वाढीचा फरक मिळावे, चुकीच्या वेतनश्रेणीमधील तफावत दूर करुन सरसकट एकसारखी वेतनश्रेणी करावी यासह अन्य मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले.

Advertisement

मागील महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात उच्च स्तरीय समितीला आठ दिवसांत अहवाल देऊन 20 ऑगस्टला कृती समितीसोबत बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. परंतू ही बैठक झाली नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर विभागांतर्गत विभागीय कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे उत्तम पाटील, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे संजीव चिकुर्डेकर, सुनिल घोरपडे, महाराष्ट्र एस.टी कामगार सेनेचे नामदेव रोडे, संदीप घाडगे इंटक संघटनेचे विजय बर्गे, विवेक कांबळे कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे दादू गोसावी, संजय कदम, दीपाली येलबेली, तन्वीर मुजावर, सुभाष सुतार, विनायक भोगम, वसंत पाटील आदी उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील यांचा आंदोलनाला पाठींबा
आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन भेट दिली. आंदोलनाला पाठींबा असल्याचेही सांगितले. यावेळी एसटी

Advertisement

Advertisement

.