शिक्षणतज्ञ दीनानाथ बत्रा यांचे निधन
‘शिक्षण वाचवा’ चळवळीचे शिल्पकार : वयाच्या 94 व्या वषी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
थोर शिक्षणतज्ञ, आदर्श शिक्षक आणि शिक्षण वाचवा चळवळीचे शिल्पकार दीनानाथ बत्रा यांचे गुऊवार, 7 नोव्हेंबर 2024 रोजी वयाच्या 94 व्या वषी वृद्धापकाळाने निधन झाले. ‘सेव्ह एज्युकेशन’ म्हणजेच ‘शिक्षण वाचवा’ चळवळीचे राष्ट्रीय संयोजक आणि शिक्षा संस्कृती उत्थान ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रीय आणि शैक्षणिक चळवळींमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका बजावली असून अनेकदा तुऊंगवासही भोगला आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नवी दिल्ली येथील नारायण विहार येथील एज्युकेशन कल्चर ट्रस्टच्या मध्यवर्ती कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
दीनानाथ बत्रा यांचा जन्म 5 मार्च 1930 रोजी अविभाजित भारतातील राजनारपूर जिह्यात, डेरा गाझी खान (आता पाकिस्तानमध्ये) झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विद्या भारती या राष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेचे ते सरचिटणीसही राहिले आहेत. शिक्षणात हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ते ओळखले जातात. 1955 मध्ये डीएव्ही स्कूल, डेरा बस्सी पंजाब येथे शिक्षक म्हणून आपल्या करिअरची सुऊवात करणारे दीनानाथ बत्रा यांनी 1965 ते 1990 या काळात कुऊक्षेत्र येथे प्राचार्य म्हणूनही काम केले आहे.
बत्रा यांनी अखिल भारतीय हिंदुस्थान स्काउट्स अँड गाईड्सचे अध्यक्षपदही भूषवले होते. ते विद्या भारती अखिल भारतीय शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीसही होते. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित दीनानाथ बात्रा यांना शैक्षणिक कार्याप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाबद्दल अनेक संस्थांनी पुरस्कार दिले आहेत. त्यांनी शिक्षणाला चालना देण्यासाठी देशव्यापी चळवळ चालवल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारत-केंद्रित शिक्षणालाही आधार देण्यात आला आहे. त्यांना स्वामी कृष्णानंद सरस्वती सन्मान, स्वामी अखंडानंद सरस्वती सन्मान, भाऊराव देवरस सन्मान असे अनेक सन्मान मिळाले आहेत.