महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अरविंद केजरीवालांना ईडीचे पुन्हा समन्स

06:00 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

21 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

यापूर्वी 2 नोव्हेंबरला ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवून ती मागे घेण्याची मागणी केली होती. त्याच दिवशी केजरीवाल मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

आता अरविंद केजरीवाल विपश्यना केंद्रात जाण्याचे नियोजन करत असतानाच त्यांना हे समन्स पाठवण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही केजरीवाल 10 दिवसांच्या विपश्यना ध्यान कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी केजरीवाल मंगळवार, 19 डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी सोडतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत विपश्यनेसाठी त्यांनी बेंगळूर आणि जयपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article