For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयावर ईडी छापे

07:00 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयावर ईडी छापे
Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

Advertisement

नगरपालिका भरती भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालचे मंत्री सुजित बोस यांच्या कार्यालयासह 11 ठिकाणी छापे टाकले. मंत्र्यांचे कार्यालय कोलकात्यातील साल्ट लेकच्या सेक्टर 1 मध्ये आहे. या कार्यालयात शुक्रवारी चार तासांहून अधिक काळ झाडाझडती चालली होती. त्याच इमारतीत मंत्र्यांची कार्यालये देखील आहेत. याशिवाय, नागरबाजार परिसरातील एका नगरसेवकाच्या निवासस्थानी तसेच सैराट बोस रोड आणि न्यू अलीपूर येथील एका आस्थापनावरही धाड टाकण्यात आली होती. भरती भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पश्चिम बंगालमधील शालेय नोकरी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान ईडीने आरोपी अयान सिलच्या जागेतून पालिका भरतीशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्यानंतर पालिका भरती घोटाळा उघडकीस आला. एप्रिल 2023 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला पालिका भरती प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.