महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणातही ईडीचे छापासत्र

06:52 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी आमदार दिलबाग सिंग यांच्यासह निकटवर्तीय टार्गेटवर

Advertisement

► वृत्तसंस्था/ चंदीगड, यमुनानगर

Advertisement

हरियाणाचे माजी आयएनएलडी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर ईडीने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये विविध ठिकाणाहून आतापर्यंत 5 कोटी ऊपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले. याशिवाय 3 सोन्याची बिस्किटे आणि विदेशी मद्याच्या 100 हून अधिक बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक पथकांनी आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंग आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या घर, कार्यालय आणि फार्म हाऊसवर छापे टाकले. ही कारवाई खाणकाम आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील खाण व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी यमुनानगरमधील महाराणा प्रताप चौकाजवळील कार्यालय, फैजपूर परिसरातील फार्म हाऊस, सेक्टर-18 येथील कार्यालय आदी ठिकाणी छापे टाकले. या कारवाईवेळी ईडीच्या पथकांनी तपासस्थळांच्या मुख्य गेटवर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात केले. अशा परिस्थितीत कोणालाही बाहेर पडण्याची किंवा तपासणीच्या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. ईडीचे पथक दिवसभर तपासस्थळी कागदपत्रांची छाननी करत होते. मॉडेल टाऊनमध्ये राहणारा दुसरा व्यापारी संजीव यांच्या घरावरही छापा टाकला. यापूर्वी जानेवारी-2022 मध्येही प्राप्तिकर विभागाने माजी आमदारांच्या घरावर शोधमोहीम राबविली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article