ईडीचे गोव्यासह दिल्ली, इतर राज्यात छापे
प्रतिनिधी/ पणजी
अ़ंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दिल्ली विभागाने गोव्यातील कॅसिनो आणि रियल इस्टेट संबंधित कंपनीच्या मालकांवर बांबोळी, दोनापावलासह दिल्ली आणि इतर राज्यातही छापे मारले आहेत. शुक्रवारी सकाळी छापेसत्राला सुऊवात झाली होती ती रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. ‘फेमा’ कायद्यांतर्गत केलेल्या या कारवाईमुळे कंपनीशी संबंधित कॅसिनो आणि रियल इस्टेट उद्योगामध्ये खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रावारी सकाळी ईडीच्या दिल्ली विभागाच्या अधिकाऱ्यांनी अगोदर कॅसिनो आणि रियल इस्टेट संबंधित कंपनीच्या मालकांच्या दोनापावला येथील बंगल्यावर धाड घातली. ही कारवाई करत असताना अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. नंतर बांबाळी येथील बंगल्यात कारवाई सुरू केली. दरम्यान, ईडीच्या दिल्ली विभागाने एकाचवेळी कंपनीच्या इतर मालकांच्या दिल्ली आणि इतर राज्यातील भागात धाडी घातल्या आहेत. ईडीने ‘फेमा’ कायद्यांतर्गत ही कारवाई केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुऊच होती. काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कारवाईत ईडीने कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह मोठ्या प्रमाणात विदेशी चलन जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.