कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोडीन कफ सिरप प्रकरणात ईडीचे छापे

06:22 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झारखंड, उत्तर प्रदेशसह गुजरातमध्ये कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कोडीन कफ सिरप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी देशभरातील अनेक राज्यांमध्ये एकाचवेळी धाडी टाकल्या. झारखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम जयस्वाल, त्याचे सहकारी आलोक सिंग आणि अमित सिंग, बेकायदेशीर पुरवठा करणारे अनेक कफ सिरप उत्पादक आणि चार्टर्ड अकाउंटंट विष्णू अग्रवाल यांना लक्ष्य करत हे धाडसत्र राबविण्यात आले.

ईडीने शुक्रवारी सकाळी लखनौ, वाराणसी, जौनपूर, सहारनपूर आणि रांची आणि अहमदाबाद येथे छापे टाकले. या प्रकरणात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे लाँड्रिंग केल्याचा ईडीला संशय आहे. कोडीन कफ सिरप बेकायदेशीरपणे साठवले जात होते, वाहतूक व व्यापार केला जात होता आणि सीमापार तस्करी केली जात होती असे तपासात आढळून आले आहे. कोडीन कफ सिरपच्या सेवनानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम जयस्वाल सध्या फरार असून तो दुबईमध्ये लपून बसल्याचे मानले जाते. दरम्यान, पोलिसांनी शुभमचा सहकारी आलोक सिंग यालाही अटक केली आहे. तो उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. सध्या त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article